
कोलोली केंद्रशाळेत सदिच्छा समारंभ
कोलोली केंद्रशाळेत सदिच्छा समारंभ
पुनाळ,ता. ३०: कोलोली (ता.पन्हाळा) येथील केंद्रशाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ झाला. स्वागत मुख्याध्यापक एल.बी.पोवार, प्रास्ताविक वर्गशिक्षक अनिल आंगठेकर यांनी केले.शिक्षणाला व्यावहारिकतेची जोड दिली तरच शिक्षण परिणामकारक होते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष
अजय पाटील यांनी व्यक्त केले .तर अभ्यास करताना जिद्द कष्ट व प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर यश दूर नसते असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे सौ.शैलजा गावडे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शाळेला डायस भेट दिल्याबद्दल शाळा.व्य.समितीने त्यांचे कौतुक केले.यावेळी शाळा व्य.समितीअध्यक्ष अमर बचाटे,संजय गावडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन संतोष जायभाय,सौ.अरुणा वसावे,सौ.सुवर्णा कणसे तसेच शाळा व्य.स.उपाध्यक्ष संदीप पाटील,संजय सुतार, जयसिंग गुरव सर व सदस्या सौ.सविता माने, सौ.कोमल गुरव उपस्थित होते.आभार अजय दाभोळकर सर यांनी मानले.
* फोटो- कोलोली - विद्यार्थ्यांनी दिलेल्या डायसचे उद्घाटन करताना मुख्याध्यापक एल.बी.पोवार शिक्षक.
तुरुकवाडी ता. ३० : मालगाव (ता . शाहूवाडी) येथील श्री. मळाईदेवी विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविवोध झाली .
४० वर्षापासून कांडवण, पळसवडे, मालगाव गावचे कार्यक्षेत्र असणा-या संस्थेवर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर , व मानसिंगराव गायकवाड गटाची सत्ता आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष व कर्णसिंह गायकवाड गट ४ तर मानसिंगराव गायकवाड व माजी आमदार सरुडकर गट ८ असे सदस्य बलाबल आहे .
नवनिर्वाचित सदस्य पुढीलप्रमाणे - आनंदराव राजाराम पाटील,चंद्रकांत नारायण पाटील,अशोक बाबूराव साळवी,दगडू भाऊ पाटील,प्रकाश वसंत दळवी,राजाराम पांडूरंग मतरे,मारुती राजाराम पाटील,अनुसया आनंदा पाटील,शंकर हरी पाटील,शंकर श्रीपती पाटील,विश्वास गुंडा बनसोडे व कमल हरीबा पाटील बिनविरोध निवडीकामी डी.के.पाटील,डी.जी . पाटील,सुभाष आगलावे,टी.सी.पाटील, बाजीराव डिगे यांनी विशेष प्रयत्न केले.
गलगलेतील श्री. राम विकास संस्था पाचव्यांदा बिनविरोध
नानीबाई चिखली ता. 29
गलगले ( ता.कागल ) येथील श्री. राम विकास सहकारी सेवा संस्थेची निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध पार पडली. उच्चांकी कर्जवाटप व वसूलीच्याबाबतीत अग्रेसर असलेल्या या संस्थेला 60 वर्षांची परंपरा आहे. संस्थेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे.
नुतन संचालक मंडळात ज्ञानदेव पिराजी पाटील, मनोहर भैरव पाटील, आनंदा निवृत्ती देशमूख, बाळासो दत्तू पाटील, सर्जेराव पांडूरंग पाटील, आबासो पुंडलिक पाटील, आप्पासो हरी पडळकर, दस्तगिर आदम पठाण, महादेव शामराव बांबरे, साताप्पा परसू कांबळे, अंजली विजय घोरपडे, शालन मधूकर डावरे यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना कागल तालूका संघाचे संचालक डी. पी. पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने राजकारण विरहित कारभार केला आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी विश्वासाने संस्थेची निवडणूक बिनविरोध केली.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच काका पाटील, उपसरपंच सतिश घोरपडे, मारुती मगदूम यांनी सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. आर. महाजन यांनी काम पाहिले. सचिव बाळकृष्ण बांबरे, लिपीक सागर मांगले यांनी सहकार्य केले. केडीसीसी बँक निरीक्षक संदीप पाटील यांनी आभार मानले.
केदारलिंग सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी अशोकराव भांदिगरे
गारगोटी, ता. २८ : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी अशोकराव साताप्पा भांदिगरे व उपाध्यक्षपदी शशिकांत बजरंग कोराणे यांची बिनविरोध निवड केली. सहायक निबंधक एस. एस. पाटील निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संचालक भिकाजी शेणवी व श्री. लिंबाजी कुपटे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक कृष्णात तेलंग, लिबाजी कुपटे, दीपक पाटील, भिकाजी शेणवी, सुरेश व्हरांबळे, सुरेश पाटील, बळवंत कुपटे, विलास कांबळे, वसंत लोहार, सौ. विजयमाला हुंदळकर, सौ. इंदूबाई पोवार, सचिव महावीर बोरगावे, शिवाजी कडव व नामदेव हुंदळकर उपस्थित होते. फोटो : got282.JPG व got283.JPG अशोकराव भांदिगरे, शशिकांत कोराणे
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54050 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..