कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू
कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू

कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू

sakal_logo
By

कोल्हापूर-अहमदाबाद
विमानसेवा ३ जूनपासून
बुकिंग सुरू; सोमवार, शुक्रवार सेवा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः कोविडमुळे स्थगित झालेली अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा ३ जूनपासून पुन्हा सुरू होत आहे. आठवड्यातील सोमवार आणि शुक्रवार या दोनच दिवस सेवा सुरू राहणार आहे. २२ फेब्रुवारी २०२१ ला इंडिगो कंपनीकडून ही सेवा सुरू केली होती. सेवेला चांगला प्रतिसाद होता, मात्र कोविडमुळे स्थगित केली होती.
सोमवारी सकाळी नऊ वाजून पंच्चावन्न मिनिटांनी अहमदाबादहून विमानाचे टेकऑफ होईल. ते कोल्हापुरात दुपारी बारा वाजता लँडिंग होईल. अर्धा तासाच्या अंतराने साडेबारा वाजता कोल्हापुरातून टेक ऑफ होईल आणि दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी ते अहमदाबाद येथे लँडिंग होईल. आठवड्यातून केवळ दोनच दिवस ही विमानसेवा सुरू राहणार असल्याचे इंडिगो कंपनीकडून जाहीर केले आहे. सध्या बुकिंगही सुरू झाले आहे. कोल्हापुरातून नागपूरला जाण्यासाठी ही विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. या विमानसेवेमुळे अहमदाबाद, राजकोट, सुरतला जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54073 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top