मधमाशांच्या हल्ल्यात आठ मुले, दोन शिक्षक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधमाशांच्या हल्ल्यात आठ मुले, दोन शिक्षक जखमी
मधमाशांच्या हल्ल्यात आठ मुले, दोन शिक्षक जखमी

मधमाशांच्या हल्ल्यात आठ मुले, दोन शिक्षक जखमी

sakal_logo
By

18510
कळसुली ः मधमाशी हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या विद्यार्थ्यांवर येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात शनिवारी उपचार झाले.


मधमाश्‍यांच्या हल्ल्यात
आठ मुले, दोन शिक्षक जखमी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३० ः तालुक्‍यातील कळसुली येथील जिल्‍हा परिषद गावडेवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाश्‍यांनी हल्‍ला केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. यात शाळेत हजर असलेले सर्व आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले. त्‍यांच्यावर कळसुली प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि येथील उपजिल्‍हा रुग्णालयात उपचार झाले.
गावडेवाडी शाळेच्या आवारात सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन मुले खेळत होती. मधमाश्‍या येत असल्‍याचे पाहून त्‍यांनी वर्गात धाव घेतली. त्‍यांच्या पाठोपाठ मधमाश्‍या वर्गखोल्‍यांमध्ये घुसल्या. या माश्‍यांनी सर्व आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांवर हल्ला केला. यामुळे मुलांनी मोठा आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर तेथील नागरिक रुजॉय फर्नांडिस यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. डॉ. पोळ यांनी कळसुली प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील रुग्‍णवाहिका शाळेत पाठविली. त्‍यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना कळसुली आरोग्‍य केंद्रात आणण्यात आले. यातील तीन विद्यार्थ्यांना सतत उलट्या होत असल्‍याने त्‍यांना अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात पाठविण्यात आले. या सर्व मुलांवर सध्या उपचार सुरू असून, त्‍यांची प्रकृती स्थिर असल्‍याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मधमाश्‍यांच्या हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या मुलांमध्ये रिद्धी सावंत, निधी सावंत, वक्रतुंड प्रभू, रोशन पाडावे, सानिका राऊत, सानिका देसाई, मयूर राणे, मानवी पाडावे यांचा समावेश आहे. घटनेनंतर राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण, संतोष सुतार, प्रकाश दळवी, गणेश पाडावे, एकनाथ दळवी, कोमल राऊत, रेश्मा प्रभू, किशोर राऊत, राजश्री पाडावे, प्रतीक्षा सावंत, प्रियंका देसाई आदींनी शाळेत धाव घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54102 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top