
भक्ती वाडकर यांचे स्वीमिंगमध्ये यश
कोल्हापूर, ता. ३० : राशिवडे बुद्रुक (ता. राधानगरी) येथील जलतरणपटू भक्ती वाडकर यांची फ्रान्समध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्कूल गेम्स् स्पर्धेसाठी निवड झाली. सध्या ती बालेवाडी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये (पुणे) प्रशिक्षण घेत आहे. तिचे वडील राहूल हमाल असून घरची परिस्थिती बेताची आहे. यासाठी भक्तीला अर्थसाह्याची गरज आहे. फ्रान्समधील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिला दोन लाख पन्नास हजार रुपयांची गरज आहे. पाच एप्रिलपर्यंत ही मदत तिला उभी करायची आहे. सहा ते सात दिवसात हे अर्थ शुल्क उभे करावे लागणार असून सर्वांनी भक्तीसाठी अर्थसाह्य करायचे आहे. जेणेकरुन भक्तीचे स्वप्न पूर्ण होईल. तिचे भविष्यातील करिअर उत्तम पद्धतीने साकार होईल. ज्यांना कुणाला ही आर्थिक मदत करायची आहे, त्यांनी हर्षल नष्टे आणि समीर चौगुले यांच्या व्हॉटस्ॲपवर संपर्क साधावा. ही आर्थिक मदत उभी करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. यासाठी प्रत्येकाने मदत करावी, असे आवाहन टीम ९२ (युनायटेड वुई स्टँड) यांनी केले आहे. भक्ती हिच्या वडीलांबरोबर चर्चा झाली. तिच्या वडीलांनी सांगितले की, एक लाख ५० हजार रुपयांची गरज लागेल. यासाठी टीमने एक लाख ५० हजार रुपये उभे करायचे आहेत. फ्रान्सला जाण्यासाठी भक्ती आणि तिच्या वडीलांनी व्हीसाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54172 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..