दड्डी पुलाची दुरुस्ती व्हावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दड्डी पुलाची दुरुस्ती व्हावी
दड्डी पुलाची दुरुस्ती व्हावी

दड्डी पुलाची दुरुस्ती व्हावी

sakal_logo
By

18640
कोवाड : घटप्रभा नदीवरील हाच तो दड्डीचा बंधारा.

दड्डी बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी
सीमाभागातील प्रवाशांची मागणी; खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक
अशोक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ४ : कर्नाटक व महाराष्ट्र हद्दीला जोडणाऱ्या घटप्रभा नदीवरील दड्डी बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी, अशी सीमाभागातील प्रवाशांची मागणी आहे. बंधाऱ्यावर खड्डे पडले आहेत. स्लॅपचे सिमेंट उडून गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. संरक्षण कठडे मोडले आहेत. दड्डी गावाकडील बाजूला पुलावर पडलेली चर अपघाताला कारणीभूत ठरत आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आधार असलेल्या या बंधाऱ्याची कर्नाटक शासनाने तातडीने दुरुस्ती करून बंधाऱ्यावरील प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
दड्डी बंधाऱ्याच्या एका बाजूला कर्नाटकची हद्द, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची हद्द सुरू होते. दोन्ही राज्यांना जोडणारा हा पूल असल्याने सीमाभागातील प्रवाशांच्यादृष्टीने पूल आधार समजला जातो. चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदी दड्डी येथे घटप्रभा नदीला मिळते. त्यामुळे पंचवीस वर्षापूर्वी नदीवर बंधारा उभा केला आहे. या बंधाऱ्यामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांची वाहतुकीची सोय झाली आहे. सीमाभागातील बहुतांशी लोकांचा वावर हा दोन्ही राज्यांच्या हद्दीत आहे. बंधाऱ्यामुळे चंदगड तालुक्यातील व दड्डी भागातील लोकांची रहदारी वाढली आहे. चंदगडमधील लोकांना कोल्हापूरला जाण्यासाठी व कर्नाटकासह कोल्हापूरातील लोकांना गोव्याला जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे दड्डी पुलावरून मोठ्या वाहनांसह प्रवाशांची रहदारी वाढली आहे. पण पुलाच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे मोडले आहेत. येथे लोखंडी संरक्षण कठड्यांची मागणी होत आहे. पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने बंधाऱ्याच्या स्लॅपवरही खड्डे पडले आहेत. पुलाची लांबी जास्त असल्याने रात्रीच्यावेळी दोन्ही बाजूने वाहने पुलावर एकदम एकत्र येतात. पुलाची रुंदी कमी असल्याने चारचाकी वाहनधारकांचा गोंधळ उडतो. वाहन पाठीमागे घेण्यावरुन वाहनधारकांच्यात खडाजंगी होण्याचे प्रकार घडतात. बंधाऱ्यावर प्रकाशाची व्यवस्था केल्यास वाहनधारकांची गैरसोय कमी होणार आहे. दड्डी गावाकडील बाजूकडे पुलावर मोठी चर निर्माण झाली आहे. ती तत्काळ भरण्याची गरज आहे. कर्नाटक शासनाने बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करून गैरसोयी दूर केल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
-------------------
काय केले पाहिजेत
- बंधाऱ्यावर लोखंडी संरक्षण कठडे
- स्लॅपवर कॉंक्रेट टाकण्याची गरज
- यर्तनहट्टी गावच्या बाजूकडील बंधाऱ्याचा भराव
- बंधाऱ्यावर रात्रीच्यावेळी प्रकाशाची सोय

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54189 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top