कोवाड-होसूर रस्त्यावर अपघाताची मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-होसूर रस्त्यावर अपघाताची मालिका
कोवाड-होसूर रस्त्यावर अपघाताची मालिका

कोवाड-होसूर रस्त्यावर अपघाताची मालिका

sakal_logo
By

18642
कोवाड ः बेळगाव बाजारपेठेला जोडणारा कोवाड ते होसूर रस्ता.


कोवाड-होसूर रस्त्यावर अपघाताची मालिका
---
अरुंद, वेडीवाकडी वळणे धोक्याची; मजबूतीकरणाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
अशोक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ९ : कोवाड ते होसूर रस्त्यावरील अपघाताची मालिका कधी थांबणार, असा प्रश्‍न कोवाड परिसरातील नागरिकांना पडला आहे. दोन महिन्यांनंतर पुन्हा ३० एप्रिलला होसूर येथे शारदा लमाणी या महिलेचा मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाला. अरुंद व वेडीवाकडी वळणे असणाऱ्या या रस्त्याची रुंदी वाढल्याशिवाय अपघाताचा धोका टळणार नाही, असे प्रवाशांचे निरीक्षण आहे. लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या मजबूतीकरणासह रुंदीकरणासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
कोवाड ते होसूर हा रस्ता कर्नाटकातील उचगाव येथे बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याला जोडला आहे. थेट बेळगाव बाजारपेठेत हा रस्ता जात असल्याने या रस्त्यावरून वाहनांची व प्रवाशांची मोठी वर्दळ असते. आजरा, गडहिंग्लज व कोवाड परिसरातील प्रवासी बेळगाव व कर्नाटकात ये-जा करणेसाठी या मार्गाचा वापर करतात. कोवाडपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर होसूरच्या टेकडीवर कर्नाटकची हद्द सुरू होते. महाराष्ट्र हद्दीतील हा आठ किलोमीटरचा रस्ता अरुंद व वेड्यावाकड्या वळणाचा आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी चढ-उतार व पावलोपावली खड्डे आहेत. दुतर्फा असलेल्या झाडाझुडपांनी रस्ता वेढला आहे. दुपदरी रस्ता असला तरी एकमेकांसमोरून जाताना वाहनांची अडचण होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणाचा विळखा आहे. रस्त्यावरून सुरू असलेल्या वाहतुकीचा विचार केला, तर रस्त्याच्या मजबुतीकरणासह रुंदीकरणाची मोठी गरज आहे. दोन महिन्यांपूर्वी होसूर येथील ममता व्हडगे या तरुणीचा रस्त्यावरील खड्ड्यात गाडी गेल्याने रस्त्यावर पडून मृत्यू झाला. ३० एप्रिलला तेऊरवाडी येथे वास्तव्याला असलेल्या कर्नाटकातील मजुराची पत्नी शारदा लमाणी यांचा होसूर घाटात अज्ञात ट्रकने दुचाकीला धक्का दिल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रवाशांत रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत व मजबूतीकरणाबाबत प्रश्‍न उभा राहिला आहे. बेळगाव बाजारपेठेला जोडणारा सीमा भागातील हा महत्त्वाचा मार्ग असल्याने कर्नाटकाने आपल्या हद्दीतील रस्त्याचे बांधकाम सुरू केले. महाराष्ट्र हद्दीतील रस्त्याची मात्र त्यादृष्टीने दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
--------------
चौकट
काय केले पाहिजे..?
- रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक
- रस्ता बांधकाम नव्याने व्हावे
- ठिकठिकाणी सूचनाफलक व दिशादर्शक फलकांची गरज
- धोकादायक वळणे हटविणे
- अत्यावश्यक सेवांची गरज

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54190 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top