सुहास नाडगौडा यांचा ‘रवळनाथ’तर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुहास नाडगौडा यांचा ‘रवळनाथ’तर्फे सत्कार
सुहास नाडगौडा यांचा ‘रवळनाथ’तर्फे सत्कार

सुहास नाडगौडा यांचा ‘रवळनाथ’तर्फे सत्कार

sakal_logo
By

18663
गडहिंग्लज : रवळनाथ सोसायटीतर्फे सुहास नाडगौडा यांचा सत्कार करताना अरुण काकडे. शेजारी एम. एल. चौगुले, अमर शिंदे आदी.

सुहास नाडगौडा यांचा
‘रवळनाथ’तर्फे सत्कार
गडहिंग्लज, ता. ३ : लोकाभिमुख प्रशासन, स्वच्छ चारित्र्य व कर्तव्य परायणेतून सुहास नाडगौडा यांनी चांगुलपणाचा व आनंदी जगण्याचा मंत्र दिला, असे गौरवोद्‍गार विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी काढले.
येथील रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी व ज्ञानदीप प्रबोधिनीतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. काकडे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. दत्ता पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नाडगौडा यांचा काकडे यांच्या हस्ते सत्कार झाला. शिंदे, चौगुले यांचीही भाषणे झाली. नाडगौडा यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील, प्राचार्य आर. एस. निळपणकर, महेश मजती, प्रा. विजय आरबोळे, उमा तोरगल्ली, संदीप कागवाडे, डी. के. मायदेव, सागर माने, बाबासाहेब मार्तंड, अशोक सुळकुडे आदी उपस्थित होते. रेखा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. मीना रिंगणे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54207 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top