कार्वेत कृषी विक्रेत्यांची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्वेत कृषी विक्रेत्यांची बैठक
कार्वेत कृषी विक्रेत्यांची बैठक

कार्वेत कृषी विक्रेत्यांची बैठक

sakal_logo
By

18702
कोवाड : कोवाड येथील साई शेती सेवा केंद्राचे विक्रेते सचिन पाटील यांचा सत्कार करताना विभागीय गुणनियंत्रक अधिकारी बंडा कुंभार, तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप व इतर.

कार्वेत कृषी विक्रेत्यांची बैठक
कोवाड, ता. २ : यंदाच्या मृग नक्षत्रात पावसाचे चांगले संकेत मिळत असल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या नियोजनात लागला आहे. बी-बियाणे, कीटकनाशके, खते व शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून नियोजन केले जात असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके (कृषी निविष्ठा) शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून कार्यवाही केली जाणार असल्याने विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक कृषी निविष्ठांची विक्री करावी,असे आवाहन विभागीय गुणनियंत्रक अधिकारी बंडा कुंभार यांनी केले.
कार्वे (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका खते, बि-बियाणे व कीटकनाशके विक्रेत्यांची संघटना व पंचायत समिती कृषी विभागातर्फे आयोजित केलेल्या कृषी विक्रेत्यांच्या बैठकीत खरीप हंगामपूर्व नियोजन, आढावा व मार्गदर्शन करताना कुंभार बोलत होते. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुधाकर खोराटे उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय कोकितकर यांन स्वागत केले. कुंभार म्हणाले, ‘‘गाव पातळीवर कृषी निविष्ठा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील गटांकडे नोंदणी करावी. कृषी मालाच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. दुकानामध्ये बियाण्‍यांचा भावफलक दर्शनी भागात लावावा. त्यावर कंपनी निहाय, जातीनिहाय बियाणे साठा व दर यांचा उल्लेख करावा. सत्यतादर्शक बियाण्याच्या पिशवीवर फक्त एकच लेबल असल्याची खात्री करावी. ग्राहकांस बियाणे खरेदीची पक्की पावती द्यावी.’’ मनोहर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र बामणे यांनी आभार मानले.
-------------------
चौकट
बियाणे खरेदीवेळी घ्या काळजी
खरेदीच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी. बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. बियाणे खरेदीवेळी विक्रेत्यांकडून पक्के बिल घ्यावे. बिलावर दुकानाचे नाव, खरेदीदाराचे नाव, उत्पादकाचे नाव, बियाण्याचे नाव, लॉट क्रमांक, विक्रीची किंमत असल्याची खात्री करावी. पावतीवर विक्रेत्याची व शेतकऱ्याची सही व अंगठा असावा, असे कृषी अधिकारी सुनील जगताप यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54238 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top