
सद्भावना रॅलीतून सलोख्याचा संदेश
18727
गडहिंग्लज : सर्व समाज बांधवातर्फे शहरातून निघालेली सद्भावना रॅली. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
सद्भावना रॅलीतून
सलोख्याचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : गडहिंग्लज शहरातील सर्व समाज बांधवातर्फे सद्भावना रॅली काढण्यात आली. देशातील सामाजिक शांतता, सलोखा व एकता अखंडीत राहावी या उद्देशाने ही रॅली निघाली. सर्व समाजातील बांधव, विविध राजकीय पक्षाचे प्रमुख मान्यवरांनी रॅलीत सहभागी होत सलोख्याचा संदेश दिला.
सकाळी दहाला लक्ष्मी मंदिरापासून रॅलीला सुरवात झाली. बाजारपेठ, वीरशैव चौक, संकेश्वर मार्ग, मुख्य मार्गावरुन रॅली दसरा चौकात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पुजन मुस्लिम समाजातर्फे झाले. तेथून रॅली प्रांत कार्यालयावर आली. या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे पुजन मराठा समाजातर्फे झाले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन लिंगायत समाजातर्फे झाले. या मूक रॅलीत सर्वांनी पाढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.
प्रा. शिवाजी भुकेले यांनी रॅलीचा हेतू स्पष्ट केला. किरण कदम, युवराज बरगे, प्रा. सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, सिद्धार्थ बन्ने, घुडूसाहेब मुगळे, प्रा. प्रकाश भोईटे, अॅड. दिग्विजय कुराडे, प्रा. अनिल कुराडे, उदय जोशी, डॉ. एम. एस. बेळगुद्री, राजू जमादार, राजु खलिफ, राजेंद्र तारळे, युनूस नाईकवाडे, रफिक पटेल, अरविंद बार्देस्कर, शिवाजी कुराडे, अनंत पाटील, गणपतराव पाटोळे, प्रा. रमेश पाटील, प्रा. सुभाष कोरे, प्रा. पुंडलिक रक्ताडे, रमजान अत्तार, प्रकाश कांबळे, उत्तम देसाई, अजित बंदी, सागर पाटील, महावीर दसुरकर, सुरेश पवार, वरुण गोसावी, साताप्पा कांबळे, शारदा आजरी, अलका भोईटे, डॉ. बेनिता डायस, सुवर्णलता गोईलकर, उर्मिला जोशी, वसुंधरा सावंत, गीता पाटील, माधवी जाधव आदी सहभागी झाले होते. प्रा. आशपाक मकानदार यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54267 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..