पृथ्वीराज पाटीलचा मांडेदूर्ग येथे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज पाटीलचा मांडेदूर्ग येथे सत्कार
पृथ्वीराज पाटीलचा मांडेदूर्ग येथे सत्कार

पृथ्वीराज पाटीलचा मांडेदूर्ग येथे सत्कार

sakal_logo
By

18783
मांडेदूर्ग ः महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील याचा सत्कार करताना सरपंच विनायक कांबळे, उपसरपंच गणपत पवार व इतर सदस्य.


पृथ्वीराज पाटीलचा
मांडेदूर्ग येथे सत्कार
चंदगड, ता. २ ः मांडेदूर्ग (ता.चंदगड) येथे आज महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील याची मिरवणुक काढण्यात आली. गावचे सुपूत्र आणि पृथ्वीराजचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच राम पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्ताने कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर अध्यक्षस्थानी होते.
ग्रामपंचायत कार्यालयापासून मिरवणुकीला सुरवात झाली. पृथ्वीराज याच्यासह पैलवान जोशीलकर व इतर मान्यवर सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसले होते. दारोदारी सुहासिनींनी पंचारतीने ओवाळून औक्षण केले. सरपंच विनायक कांबळे यांनी स्वागत केले. राम पवार यांनी प्रास्ताविकामध्ये कुस्ती या खेळाबद्दलची माहिती सांगितली. चंदगड तालुक्यालाही कुस्तीची मोठी परंपरा आहे. पैलवान जोशीलकर हे सुध्दा याच तालुक्यातील असून त्यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. जोशीलकर, पवार यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटीलचा सत्कार झाला. जोशीलकर म्हणाले, ‘‘सुमारे २१ वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी किताब मिळवता आला. त्यासाठी पृथ्वीराजने घेतलेले कष्ट, त्याला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे कष्ट महत्वपूर्ण ठरले.’’ राष्ट्रीय विजेता सोनबा गोंगाणे, नेत्रपाल, लक्ष्मण भिंगुडे, पैलवान कृष्णा सावंत, पुंडलिक घाडे, राम पवार, लक्ष्मण पवार यांचाही सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना पृथ्वीराज पाटील कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी नाना डसके, संदीप पाटील, गणू पाटील, सुनील पाटील, नारायण पाटील, दौलत पाटील, प्रताप डसके, निंगाप्पा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच गणपत पवार यांनी आभार मानले.
---------------------
कोट
मी मातीतील कुस्तीचा सराव केला होता. परंतु स्पर्धा मॅटवरील कुस्तीची असते. त्याचा सराव मला मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये करता आला. प्रशिक्षक पवार यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यामुळेच या स्पर्धेत यशस्वी होऊ शकलो.
- पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र केसरी विजेता

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54324 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top