सेवा संस्थांमधील सत्तेसाठी तीनशे कोटींचा चुराडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा संस्थांमधील सत्तेसाठी तीनशे कोटींचा चुराडा
सेवा संस्थांमधील सत्तेसाठी तीनशे कोटींचा चुराडा

सेवा संस्थांमधील सत्तेसाठी तीनशे कोटींचा चुराडा

sakal_logo
By

संस्थांच्या सत्तेसाठी ३०० कोटींचा चुराडा
सेवा संस्था निवडणुका ; गावागावात इर्षा, चुरस
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : सहकाराचा केंद्रबिंदू किंवा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील १४०० पैकी ९०० ते ९५० सहकारी विकास सेवा संस्थांच्या निवडणूका पूर्ण झाल्या आहेत. निवडणुका घेण्यासाठी सुमारे ३ ते साडेतीन कोटींचा शासकीय खर्च झाला. ज्या संस्थांत निवडणूक झाली, त्या संस्थेचा संचालक होण्यासाठी गावागावात इच्छुक उमेदवारांनी व्यक्तिगत केलेल्या खर्चाचा ताळमेळ पाहता, हा खर्च सुमारे २५० ते ३०० कोटींपर्यंत झाल्याचे चित्र आहे. काहींना यात यश आले तर काहीजण अजूनही १० टक्‍क्‍याने सावकाराचे व्याज भरत आहेत.
जिल्ह्यात दीड महिन्यापासून सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. एक-एका संस्थेत दोन-दोन पॅनेल झाली. एका संस्थेत सरासरी १० ते १५ संचालक नियुक्त केले आहेत.
जे विजयी झाले असले तरीही त्यांना निवडणूक महागात पडली आहे. तर, पराभूत झालेल्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. तरीही, गावातील सहकारी सेवा संस्थेत संचालक असणे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे ज्या-त्या गावात पदासाठी इर्षा पाहायला मिळते.

९५० संस्थांच्या निवडणूक पूर्ण
जिल्ह्यात सध्या जाहीर झालेल्या १४०० पैकी सुमारे ९०० ते ९५० संस्थांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. अनेक संस्थांत विजयी होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून खर्च केला. हॉटेलमध्ये जेवण, रस्सा पार्टी, तर प्रत्येक मतासाठी पाकिटही वाटली. जिल्ह्यातील या ९०० हून अधिक संस्थांमधून एकूण २५० ते ३०० कोटी खर्च झाल्याचे चित्र आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात झालेल्या एकत्रिक खर्च पाहता, गावातील इर्षा प्रकर्षाने समोर येत आहे. यात कोणत्याही पक्षाचा मुद्दा नसतो. तर गटा-गटातच निवडणुकांनी रान पेटलेले असते. अजूनही काही संस्थांची निवडणुका होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54371 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top