
सन्मती बँक कर्मचारी वेतन वाढ
सन्मती बँक कर्मचाऱ्यांना २० टक्के पगार वाढ
इचलकरंजी, ता. ३ ः येथील सन्मती सहकारी (मल्टिस्टेट) बँकच्या कर्मचाऱ्यांचा वेतनश्रेणी करार संपुष्टात आल्याने २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी नवीन वेतन श्रेणी करार केला. बँकेच्या प्रगतीमध्ये सेवकांनी २०२२ ताळेबंद व नफा-तोटा पत्रक व नफा चांगला झाला. संचालक मंडळ व सेवक यांच्यात वेतनश्रेणी करार होऊन बँकेतील कायम सेवकांना १ एप्रिलपासून मूळ पगारात २० टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती चेअरमन सुनील पाटील यांनी दिली.
श्री. पाटील म्हणाले, ‘बँकेतील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात दीर्घ मुदतीचे गृहकर्ज ६ टक्के व्याजदाराने, वाहन, शैक्षणिक व वैयक्तिक कर्ज ७ ते ८ टक्के व्याजदाराने उपलब्ध करण्यात येत आहे. बँकेच्या सेवकांचा नेहमीच विचार केला जात असून, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेडिक्लेम विमा १ ते २ लाखांचा उतरविला आहे. अद्ययावत रुग्णालयात सेवकांना उपचाराची व्यवस्था केल्याने कोणत्याही साध्या आजारावर उपचाराचा खर्च बँक करणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे सेवकांना कोणतीही पगार वाढ दिली नव्हती. बँकेच्या नफा-तोटा पत्रकावर नियमापेक्षा जादा खर्च पडणार नाही, याची दक्षता घेऊन पगार वाढीचा वार्षिक खर्च ०.७५ टक्केपेक्षा कमी राहील, याची दक्षता घेतली आहे.’
व्हाईस चेअरमन महादेव कांबळे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अजित कोईक, शीतल पाटील, डॉ. पी. व्ही. कडोले, चंद्रकांत पाटील, डॉ. अरुण कुलकर्णी, आण्णासो मुरचिटे, शिवाजी माळी, प्रदीप मणेरे, विठ्ठल चोपडे, डॉ. आप्पासो होसकल्ले, संजय चौगुले, प्रा. ए. जे. पाटील, श्रीमती जयश्री चौगुले, सौ. वसुंधरा कुडचे, तज्ज्ञ संचालक महावीर येळरुटे व मनीष पोरवाल व सीईओ अशोक पाटील असि. सीईओ समीर मैंदर्गी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54413 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..