
शाळा, महाविद्यालये अन् काही बातम्या
न्यू कॉलेजमध्ये बँक कॅम्पस मुलाखती
कोल्हापूर : न्यू कॉलेजमध्ये आय.सी.आय.सी.आय. बँक कॅम्पस मुलाखतीचे आयोजन वाणिज्य विभागाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे केले होते. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संपर्क व्यवस्थापक पदासाठी समक्ष मुलाखती झाल्या. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बँकेतील कामकाज, विविध पदे व संधी, स्पर्धा परीक्षामधील बँकामध्ये निर्माण होणाऱ्या संधी आणि त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यावर मार्गदर्शन केले. आय.सी.आय.सी.आय. बँकेतर्फे शिवम सिंग, करिअर सल्लागार पायल तलेसरे यांनी आय.सी .आय.सी.आय. बँकेबद्दल माहिती व शैक्षणिक पात्रता, इतर कौशल्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीसाठी पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे आणि पदवी पूर्ण झालेले अशा १२४ विद्यार्थी, विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला. डॉ. ए. जी. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. के. डी. कांबळे यांनी आभार मानले.
...
ॅकमला’मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
कोल्हापूर : कमला कॉलेजमध्ये एक आठवड्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर झाले. प्रा. जॉर्ज क्रुझ, प्रा. दिपक बोलवाडे, प्रा. अजिंक्य आपके, प्रा. गोपाळ पाटील, प्रा. प्रणव शेटे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर उपस्थित होत्या. प्रा. डॉ. अनिल घस्ते यांनी संयोजन केले. प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आरती कणेरे यांनी आभार मानले.
...
18868
कोल्हापूर : रोजगारांची संधी यावर बोलताना हिरेन कुलकर्णी.
कमला महाविद्यालयात कार्यशाळा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन केंद्र, महीका मुंबईतर्फे कमला महाविद्यालयात ‘पदवीधर महिलांसाठी रोजगाराच्या संधी आणि क्षमतेची बांधणी’ यावर कार्यशाळा झाली. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ‘महीका’चे संस्थापक हिरेन कुलकर्णी, सहसंस्थापक अनुपमा रामटेके यांनी विद्यार्थिनींसाठी बी.पी.ओ क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत; मात्र त्यासाठी विविध क्षमता निर्माण केल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जगभरात वाढणाऱ्या रोजगार संधीचा फायदा विद्यार्थिनींनी करून घ्यावा. आपले भवितव्य उज्वल करावे, असे डॉ. मुडेकर यांनी सांगितले. शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, शिवाजी विद्यापीठ सेंट्रल प्लेसमेंट समन्वयक डॉ. गजानन राशिनकर यांचे सहकार्य लाभले. डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम झाला. प्रा. डॉ. वर्षा मैदर्गी यांनी आयोजन केले. सचिन देठे, प्राची खाडे, शिवानी कागले, पूजा दुधगावकर उपस्थित होते.
...
18875
कोल्हापूर : पुरोगामी शिक्षक संघटना शहर शाखेतर्फे पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवर.
मनपा शाळांतील मुख्याध्यापिकांचा गौरव
कोल्हापूर, ता. ३ : ‘‘महिला मुख्याध्यापिकांना सावित्रीच्या लेकी पुरस्कार देऊन पुरोगामी शिक्षक संघटनेने पुरोगामित्व जपले,’’ असे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.
पुरोगामी शिक्षक संघटना शहर शाखेतर्फे महापालिका शाळांतील सर्व महिला मुख्याध्यापिकांना ''सावित्रीच्या लेकी'' पुरस्कार देऊन गौरवले. तसेच ५ वी, ८ वी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापकांचा सत्कार केला.
माजी प्रशासनाधिकारी पी. जी. साठे म्हणाले, ‘‘कोणत्याही शाळेची गुणवत्ता ही त्या शाळेच्या शिक्षकांवर अवलंबून असते हे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी सिद्ध करून दाखवले.’’ प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार म्हणाले, ‘‘महापालिका शाळांची गुणवत्ता वाढल्यामुळेच अनेक शाळांमध्ये प्रवेश फुल्ल झाला.’’ राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, शिक्षक सेना प्रमुख संतोष आयरे, पुरोगामी जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई उपस्थित होते.
शहराध्यक्ष विलास पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. आर. जी. कांबळे, संजीवनी व्हरगे यांनी सूत्रसंचलन केले. स्मिता कारेकर यांनी आभार मानले. सुजाता पोवार, संतोष आंबेकर, किशोर शिनगारे, नितीन गभाले, सोनाली मोरे, शिवाजी मेथे पाटील, आनंदा पाटील आदींनी नियोजन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54427 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..