चेतना शाळेतील फलक महिंद्रा यांनी केला ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेतना शाळेतील फलक महिंद्रा यांनी केला ट्विट
चेतना शाळेतील फलक महिंद्रा यांनी केला ट्विट

चेतना शाळेतील फलक महिंद्रा यांनी केला ट्विट

sakal_logo
By

18882
चेतना शाळेतील फलक
आनंद महिंद्रा यांनी केला ट्विट
कोल्हापूर, ता. २ ः येथील चेतना अपंगमती विद्यालय मतिमंद मुलांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त काल शाळेत फलक लेखनातून त्यांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा देण्यात आल्या. याच फलकाचा फोटो ट्वीट करत श्री. महिंद्रा यांनी माझ्यासाठी वाढदिवसाची ही खास भेट असल्याचे म्हटले आहे.
शाळेतील उद्योग केंद्रासाठी दोन वर्षांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने तेलाचा लाकडी घाणा देणगी म्हणून दिला आहे. त्यामुळे उद्योग केंद्रात आता तेलाची निर्मितीही सुरू झाली आहे. त्यामुळे चेतना परिवार आणि श्री. महिंद्रा यांच्यामध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शाळेतील कलाशिक्षक सचिन एकशिंगे यांनी फलकलेखन केले.


फोटो : 18895 अजित चव्हाण,
18899 अजित राऊत

अजित चव्हाण अध्यक्षपदी
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील श्री वेताळ तालीम मंडळाची जनरल सभा झाली. कार्यकारी मंडळाची निवड केली. अजित चव्हाण अध्यक्षपदी तर उत्तम कोराणे उपाध्यक्षपदी, अजित राऊत यांची सचिव म्हणून तर महिपती पांडे यांची खजानीस म्हणून निवड झाली. सदस्य असे : सुजित चव्हाण, सम्राट कोराणे, किसन भोसले, आनंदा पावले, प्रभाकर नरके, शिवाजी पाटील, वसंतराव मगदूम, सुधाकर पाटील, राजेंद्र साळोखे, तुळशीदास राऊत, संजय जगताप.


01195
वडणगे ः येथे ‘माझी शाळा माझी स्वच्छता‘ मोहिम उपक्रमातंर्गत जि.प च्या प्राथमिक शाळेच्या परिसरात श्रमदान करताना नागरिक.

वडणगेत शाळा परिसराची स्वच्छता
वडणगे ः येथील जिल्हा परिषदेच्या कन्या व शिवाजी मंदीर या प्राथमिक शाळा परिसरात वडणगे कृती समितीसह विविध सामाजिक संघटना, विदयार्थी, शिक्षकांनी स्वच्छता मोहिम राबवली. सर्वाच्या श्रमदानातून शाळा परिसर स्वच्छ झाला. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरातील अस्वच्छतेबाबतचे वृत्त ‘सकाळ''ने २१ मार्च रोजी प्रसिध्द झाले होते .या वृत्ताची दखल घेत वडणगे कृती समितीने ‘माझी शाळा माझी स्वच्छता‘ मोहिम हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. समितीसह गावातील विविध सामाजिक संघटना, माजी विदयार्थी, शिक्षक, पालक, विदयार्थी, ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहिम राबवून शाळा परिसर चकाचक केला होता. यावेळी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शाळा परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. मागील मोहिमेवेळी ठरल्यानुसार याठिकाणी अभिजित ओवाळे या सुरक्षा रक्षकाचीही नेमणूक केली आहे. सुरक्षा रक्षक नेमल्याने यापरिसरातील मद्यपींचा वावरही थांबला आहे.

कोल्हापूर: प्रभाकर कमळकर लिखित ‘ठिगळ'' कथासंग्रहाचे प्रकाशनप्रंसगी सुभाष चौगुले, प्रभाकर हेरवाडे, विश्वास सुतार, लेखक प्रभाकर कमळकर आदी.

‘ठिगळ'' कथासंग्रहाचे प्रकाशन
फुलेवाडी : ग्रामीण भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनाशी नाळ जोडलेला ठिगळ हा कथा संग्रह आहे. प्रभाकर कमळकर यांनी सत्य कथांमधून लोकांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केल्याने या कथा मनाला भावतात असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी केले. राजर्षी शाहू स्मारक भवनात प्रभाकर कमळकर लिखित ‘ठिगळ'' कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रभाकर हेरवाडे होते. साहित्यिक विश्वास सुतार म्हणाले, प्रसंगात शिरून अनुभवाने ठिगळ हा कथासंग्रह लिहिला आहे.
लेखक प्रभाकर कमळकर म्हणाले, प्रत्येक कथेतून समाज विश्व मांडण्याचा तसेच विधायक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी.कमळकर, एस.के.यादव, प्रथमेश कमळकर यांची मनोगते झाली. यावेळी डी.एन.कमळकर, भगवान चौगुले, डी.ए.पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, राजीव परीट, प्रसाद पाटील, अर्जुन पाटील,रघुनाथ खोत,
सुरेश कांबळे, गौतम वर्धन, मनीषा कमळकर उपस्थित होते. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब कमळकर यांनी आभार मानले.

00976
निगवे दुमाला : येथील जयहिंद विकास सेवा संस्थेला उत्कृष्ट नियोजनासाठी मिळालेले मानांकन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना जयश्री यादव, प्रकाश पाटील, दिलीप यादव, एस.के. एकशिंगे आदी.

जयहिंद सेवा संस्थेला मांनाकन
भुये: निगवे दुमाला (ता. करवीर) येथील जय हिंद विकास संस्थेला उपायुक्त कार्यालय पुणे विभाग (आयएसओ ९००१, आयएसओ२८०००-२००७) गुणवत्ता धोरण व पुरवठासाखळी धोरण, उत्कृष्ट नियोजनासाठीचे मांनाकन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसुळ उपस्थित होते. संस्थेने सततचा ऑडिट वर्ग''अ''मिळवला आहे. तसेच कामाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांची मानांकनासाठी निवड झाली. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष जयश्री यादव, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, एस.के.एकशिंगे, दिलीप यादव, शिवाजी कुशिरेकर, उत्तम कांबळे, तानाजी लाड आदी उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचार्यातर्फे परिपत्रकाची होळी
कोल्हापूर ः एकात्मिक बाल विकास आयुक्तांनी २९ एप्रिल रोजी परिपत्रक काढून मे महिन्यातील उन्हाळी सुट्टीत एकतर्फी कपात केल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. या परीपत्रकाची अंगणवाडी सेविका व मदतनीस ४ रोजी प्रकल्पस्तरावर होळी करणार आहे. परिपत्रक रद्द करावे.सुट्ट्या द्याव्या, असे निवेदन देणार आहेत असा निर्णय महाराष्ट्रभरातील ७ संघटनांच्या कृती समितीने केला. प्रतिवर्षी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मे महिन्यात १५-१५ दिवस सुट्टी प्रत्येकी मिळते. यंदा २ मे पासून सुट्टीवर जाण्याच्या तयारीत असणाऱ्या कर्मचार्याना सुट्टी १५ ऐवजी ७ दिवसाची करून आयुक्तांनी धक्का दिला. परिपत्रक २९ एप्रिल रोजी काढले. ते सेविकांना ३० रोजी प्राप्त झाले. यावरून प्रशासनाची गर्विष्ठ आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कस्पटा समान लेखण्याची मानसिकता दिसते, असे संघटनेने परिपत्रकात म्हटले आहे. ही चीड आणणारी बाब असून जर आयुक्तांनी २९ एप्रिलचे परिपत्रक मागे घेतले नाही तर नाईलाजाने तीव्र आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने दिला आहे.

09336
मुंबई : राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचा कुमार विष्णू गोरे याला राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार देऊन गौरविताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत.

कुमार गोरेला उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार विष्णू गोरे याला राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार देऊन गौरविले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०१६-१७ ते २०२०-२१ कालावधीतील विविध पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यक्रम एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे झाला. विष्णू गोरे याने अनेक सामाजिक कार्यक्रमांत सक्रीय सहभाग घेतला आहे. यात जलसंवर्धन, हरित गावे, अवयव दान शिबिरे, प्रौढ शिक्षण, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर यांचा समावेश आहे. त्याला कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले, डॉ.जी.जी.खोत, डॉ.ए.एस. बागडे, डॉ.एम.एस.जाधव, डॉ. मनिषा मोटे यांचे मार्गदर्शन मिळाले.

18885
कोल्हापूर : डी. बी. पाटील व्याख्यानमालेंतर्गत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना डॉ. सुनीलकुमार लवटे.

नवे शैक्षणिक धोरण पहाट स्वप्न : डॉ. लवटे

कोल्हापूर : ‘‘नवीन शैक्षणिक धोरण हे पहाट स्वप्न आहे,’’ असे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी सांगितले. डी. बी. पाटील अमृतमहोत्सवी व्याख्यानमाला समितीव्दारे श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊस आयोजित ''नवीन शैक्षणिक धोरण २०२०'' यावर व्याख्यान झाले. डॉ. लवटे म्हणाले, ‘‘नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे भारतातील पहिले शैक्षणिक धोरण आहे.
जे शिक्षणाचा सर्वकष विचार करते. शिक्षणात मूलभूत बदल करणारे हे धोरण आहे. बालकांचा समग्र विचार सर्वप्रथमच या शैक्षणिक धोरणाने केला आहे. मूल जसं आहे, तसं स्वीकारून त्याला आकार देणे गरजेचं आहे. जेव्हा घरा-घरांतील मानसिकता बदलेल तेव्हाच भारत खऱ्या अर्थानं बदलेल.’ प्रा. डॉ.आर.के. कामत म्हणाले, ‘‘नवीन शैक्षणिक धोरण ही संधी आहे. त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर धोकाही आहे. या धोरणात सर्जनशिलता, सहयोग, चिकित्सक विचार आणि संवादावर भर दिला आहे.’’ प्रा. विनय पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी ओळख करून दिली. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे अध्यक्षस्थानी होते. डॉ. मनीषा नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले. वाय. एस. चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54469 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top