मोतीबाग तालमीचा उदयराज विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोतीबाग तालमीचा उदयराज विजेता
मोतीबाग तालमीचा उदयराज विजेता

मोतीबाग तालमीचा उदयराज विजेता

sakal_logo
By

18943, 18944
कोवाड : येथील कुस्ती मैदानात आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील कुस्ती लावताना. दुसऱ्या छायाचित्रात कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी.


मोतीबाग तालमीचा उदयराज विजेता
कोवाडमध्ये मैदान; इचलकरंजीच्या शेट्येला दाखविले आस्मान
कोवाड, ता. ३ ः येथील बलभीम व्यायाम मंडळ व ग्रामस्थांतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीचा मल्ल उदयराज पाटील याने घुटना डावावर इचलकरंजीच्या विक्रम शेट्ये याला आस्मान दाखवून प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली. डोळ्यांचे पारणे फेडणारी चटकदार कुस्ती झाल्याने मैदानातील कुस्ती शौकिनांनी जल्लोष करून आनंद साजरा केला. बजरंग आबदागिरे यांच्या हलगीच्या तालात रात्री १० वाजेपर्यंत कुस्तीचे मैदान प्रेक्षकांनी फुलून गेले होते.
आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरविलेल्या कुस्ती आखाड्याचे हेमरस साखर कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल, शेती अधिकारी सुधीर पाटील व अशोकराव देसाई यांनी पूजन केले. बेळगावचे माजी आमदार संजय पाटील मैदानात उपस्थित होते. या वेळी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, प्रा. दीपक पाटील, सुरेश घाटगे, सरपंच अनिता भोगण, विष्णू जोशिलकर, एम. जे. पाटील, शंकर मनवाडकर उपस्थित होते.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत इचलकरंजीच्या प्रशांत जगतापने कोल्हापूर शाहू कुस्ती केंद्राच्या गणेश मुंडेला चितपट करुन अवघ्या तिसऱ्या मिनिटाला कुस्ती जिंकली. कर्नाटक केसरी विजेता मल्ल संगमेश बिराजदारने कुमार महाराष्ट्र केसरी विजेता सूरज मुंडेवर विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली, तर कोवाडच्या सागर राजगोळकरने कर्नाटक चॅम्पियन हणमंत गंधलवालवर एकलंगी डावावर चौथा सामना जिंकला. शाहू कुस्ती केंद्राचा मल्ल एकनाथ बेंद्रेने कोवाडच्या कीर्तीकुमार बेनकेला चितपट करून पाचव्या क्रमांकाची कुस्ती जिंकली. आखाड्यात ५० नेत्रदीपक कुस्त्या झाल्या. प्रमुख कुस्त्यांसह आखाड्यात शंकर चौगुले (कोल्हापूर), विक्रम पाटील (शिनोळी), प्रेम कंग्राळी, ओम कंग्राळी, अतुल डवरे, तुषार जगताप (इचलकरंजी), गणेश पोकरे, अनिकेत हवालदार, राजेंद्र पाटील, प्रथमेश कंग्राळी, धनंजय वांद्रे, राज शेळके, विनायक वास्कर, रवी पाटील (तुर्केवाडी), सिध्दू दवाई (तिर्थकुंडये) यांच्यासह अनेक मल्लांनी आखाडा गाजविला. विष्णू जोशिलकर, राम पवार, लक्ष्मण पवार, लक्ष्मण भिंगुडे, देवजी पाटील, शंकर पाटील, कल्लापा चोपडे, जिवणू धर्मोजी, तानाजी आडाव यांनी पंच म्हणून काम पाहिले. सुकुमार माळी व रामा व्हन्याळकर यांनी निवेदन केले. तानाजी आडाव यांनी आभार मानले.
----------------
चौकट
पृथ्वीराज पाटीलचा सन्मान
आखाड्यात महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांचा आमदार राजेश पाटील व माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी प्रेक्षकांनी मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश दाखवून सन्मान केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54545 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top