के. भो. टप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

के. भो. टप्पा
के. भो. टप्पा

के. भो. टप्पा

sakal_logo
By

19124
19118
19125

निधीअभावी नव्या कामांना ‘खो’
--
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे कवित्व; झालेल्या कामांचीही मोडतोड

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिसऱ्या नूतनीकरणाला सात वर्षे पूर्ण झाली. त्यातील काही कामांची मोडतोड होऊ लागली आहे. तरीही आवश्‍यक अनेक कामांना निधीअभावी गतीच मिळालेली नाही. महापालिकेकडे उपलब्ध निधीतून शिल्लक कामांपैकी कोणती कामे होऊ शकतात, हे पाहून त्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. यामुळे नवी कामे जुनी झाली तरी पूरक कामांचा अजून पत्ता नाही, अशी स्थिती आहे.
नूतनीकरणाचा प्रकल्प आराखडा आर्किटेक्ट सुरत अंजली असोसिएशनने केला. यापूर्वी दोनदा नूतनीकरण झाले आहे. २०१३ मध्ये नाट्यगृहाचे मूळ रूप जपण्यासाठी नूतनीकरण करण्याचे महापालिकेने ठरवले. त्यानुसार प्रस्ताव तयार करून पहिल्या टप्प्यात १० कोटींचा निधी उपलब्ध झाला. त्यातून एप्रिल २०१५ मध्ये काम पूर्ण झाले. नाट्यगृहाच्या दगडी इमारतीचा बाज कायम ठेवत लाकडी काम केले; पण त्या लाकडी कामाला जशी देखभाल आवश्‍यक आहे, तशी न झाल्याने सात वर्षांतच इमारतीचा आकर्षकपणा गेला आहे. कॉरिडॉरमधील डेकोरेशनची लाकडी डिझाईन तुटत चालली आहे. खिडक्या-दारांची रया गेली आहे.

--
पहिल्या टप्प्यातील कामे लटकली
पहिल्या टप्प्यात लाईट अँड साउंड, अॅकॉस्टिक्स, वातानुकुलित यंत्रणा, अद्ययावत स्टेजचे काम झाले असले तरी त्याला पूरक असलेले ब्लॅक बॉक्स, आपत्तकालीन व्यवस्थेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी टाकी, तिकीट खिडकी, कॅंटिन, स्वच्छतागृह, कलादालनातील इंटिरियर, चेंजिंग रूम आदींची कामे लटकली आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील
कामांसाठी १० कोटींचा प्रस्ताव
दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेने १० कोटींचा प्रस्ताव पाठवला. त्यानुसार शासनाने मूलभूत सुविधांसाठी १ कोटीचा निधी दिला आहे. त्यातून सर्व कामे होऊ शकत नाहीत. ब्लॅक बॉक्स हा नाट्यगृहातील महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. त्यामुळे हे कामच मागे पडले आहे.

चौकट
कामासाठी निधी केव्हा
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र, त्यांच्या कार्याची प्रमुख आठवण असलेल्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या आराखड्याला पूर्ण स्वरूप देण्यासाठी सात वर्षे घालवली आहेत, ही बाब खटकणारीच आहे.


कोट
दुसऱ्या टप्प्यात पाठवलेल्या १० कोटींच्या प्रस्‍तावावर एक कोटीचा निधी आला आहे. त्यातून महत्त्वाची कामे करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जात आहे. त्या कामांची यादी प्रशासकांकडे पाठवून त्यांची मंजुरी घेण्यात येणार आहे.
- अनुराधा वांडरे, कनिष्ठ अभियंता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54568 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top