
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
19012
मनोहर गुरबे
प्रा. मनोहर गुरबे समन्वयकपदी
गडहिंग्लज : येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अॅकॅडमीच्या प्राचार्यपदी व जेईई, नीट प्रशिक्षणासाठी नव्याने सुरू केलेल्या इंटेन्ट अॅकॅडमीच्या समन्वयकपदी प्रा. मनोहर गुरबे यांची नेमणूक केली आहे. रवळनाथ हौसिंग सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी प्रा. गुरबे यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, सचिव संदीप कागवाडे, प्रा. व्ही. के. मायदेव, महेश मजती, डॉ. आर. एस. निळपणकर, डॉ. संजय चौगुले, मीना रिंगणे, रेखा पोतदार, उमा तोरगल्ली, गौरी बेळगुद्री आदी उपस्थित होते. प्रा. गुरबे मूळचे शिप्पूर तर्फे नेसरी येथील आहेत. त्यांनी कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून ३५ वर्षे काम केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा अॅकॅडमीमधील विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास चौगुले यांनी व्यक्त केला.
--------------
19095
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथे राजे फाऊंडेशनतर्फे ई-श्रम कार्ड शिबिर घेतले. या शिबिरात २०० हून अधिक लाभार्थ्यांची ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करण्यात आली. त्यांना ई-श्रम कार्डचे फायदे आणि महत्त्व पटवून देण्यात आले. विशाल कानडे, सतीश कानडे, शीतल कानडे यांनी परिश्रम घेतले.
------------
19027
बहिरेवाडी : भैरवनाथ हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात जयवंत शिंत्रे यांचा सत्कार करताना उदय जोशी. शेजारी वसंतराव धुरे आदी.
जयवंत शिंत्रे यांचा सत्कार
गडहिंग्लज : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील श्री भैरवनाथ हायस्कूलचे प्रयोगशाळा परिचर जयवंत शिंत्रे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार झाला. जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष उदय जोशी, आजरा कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनील बावन्नावर यांनी प्रास्ताविक केले. जोशी, धुरे, मारुतराव घोरपडे, सुरेश दास यांची मनोगते झाली. शिंत्रे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक एस. आर. मुंढे, संजय शेणगावे, सुरेश खोत, उर्मिला जोशी, काशीनाथ तेली, शिरीष देसाई, महादेव पाटील, अनिल चव्हाण, अमर मांगले, राजाराम फाळके, चंद्रकांत गोरुले आदी उपस्थित होते.
-------------------
19028
भडगाव : डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये झालेल्या प्रग्यान कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी.
शिंदे पॉलिटेक्निकमध्ये ‘प्रग्यान’ उत्साहात
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रग्यान २ के २२ उपक्रम उत्साहात झाला. विभागानुसार मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर विभागासाठी पेपर प्रेझेंटेशन व टेक्निकल क्विज झाले. पाल पॉलिटेक्निक कॉलेज, के. पी. पाटील पॉलिटेक्निक, वांद्रे पॉलिटेक्निक, आरसीआरई गारगोटी येथील विद्यार्थी सहभागी झाले. दोन्ही स्पर्धेत यश मिळविलेल्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. संस्थेच्या सचिव स्वाती कोरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54616 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..