हनुमान सेवा संस्थेचे तानाजी गडकरी अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनुमान सेवा संस्थेचे तानाजी गडकरी अध्यक्ष
हनुमान सेवा संस्थेचे तानाजी गडकरी अध्यक्ष

हनुमान सेवा संस्थेचे तानाजी गडकरी अध्यक्ष

sakal_logo
By

19053
तानाजी गडकरी, मारुती बेनके

हनुमान सेवा संस्थेचे
तानाजी गडकरी अध्यक्ष
चंदगड ः मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील हनुमान विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. स्थापनेपासून चाळीस वर्षे या संस्थेची निवडणूक बिनविरोध होत आहे. या निवडणुकीतही तो पायंडा कायम राहिला. आमदार राजेश पाटील गटाची सत्ता कायम राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी के. आर. कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी तानाजी गडकरी, तर उपाध्यक्षपदी मारुती बेनके यांची निवड करण्यात आली. संचालक जोतिबा हारकारे, संभाजी बोकडे, पांडुरंग बेनके, संभाजी बोकडे, अनंत तुपारे, अर्जुन बोकडे, दीपक बोकडे, मनीषा इंजल, सुप्रिया बेनके, राजन परीट, विष्णू नाईक हे नूतन संचालक उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार करण्यात आला. संदीप बोकडे, प्रल्हाद गडकरी यांच्यासह सभासद उपस्थित होते. उपसरपंच पांडुरंग बेनके यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54631 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top