तांबूळवाडी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संजय पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांबूळवाडी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संजय पाटील
तांबूळवाडी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संजय पाटील

तांबूळवाडी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संजय पाटील

sakal_logo
By

19055
संजय पाटील, शंकर पाटील
तांबूळवाडी सेवा संस्थेच्या
अध्यक्षपदी संजय पाटील
उपाध्यक्षपदी शंकर पाटील यांची निवड
चंदगड, ता. ३ ः तांबूळवाडी (ता. चंदगड) येथील तांबूळवाडी विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. दौलत कारखान्याचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाने सर्व तेरा जागांवर विजय संपादन केला. निवडणूक निर्णय अधिकारी महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी संजय पाटील यांचे नाव शंकर पाटील यांनी सुचवले. त्याला गुंडू पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी शंकर पाटील यांचे नाव निंगोजी पाटील यांनी सुचवले. त्याला वसंत पाटील यांनी अनुमोदन दिले. संचालक महादेव पाटील, जक्कोबा पाटील, श्रीकांत पाटील, निंगोजी पाटील, वसंत पाटील, गुंडू पाटील, नारायण सावंत, अशोक सुतार, शिवाजी ननवरे, प्रतिभा पाटील, शोभा मिलके यांचा महादेव पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना संजय पाटील म्हणाले, ‘‘तांबूळवाडी गावाने नेहमी एकजुटीचे दर्शन घडवले आहे. सेवा संस्थेच्या माध्यमातून गट-तट न मानता शेतीसाठी लागणारे आर्थिक तसेच खते, बी-बियाणे पुरवले आहे. यापुढील काळातही असेच एकजुटीने राहूया.’’ श्रीनिवास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश पाटील, रमेश भोसले, अरुण पाटील, शरद पाटील, पुंडलिक पाटील, रवळू पाटील, परशराम मिलके उपस्थित होते. सचिव तुकाराम कल्याणकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54633 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top