समाजात माणुसकीचा धर्म वाढवा : मौलाना हक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजात माणुसकीचा धर्म वाढवा : मौलाना हक
समाजात माणुसकीचा धर्म वाढवा : मौलाना हक

समाजात माणुसकीचा धर्म वाढवा : मौलाना हक

sakal_logo
By

समाजात माणुसकीचा
धर्म वाढवा : मौलाना हक
चंदगड, ता. ४ ः समाजामध्ये धार्मिकतेच्या नावाने विष पेरण्याचे काम सुरू आहे. दुभंगलेला समाज अस्तित्व हिरावून बसतो. त्यामुळे अशा चिथावणींना बळी पडू नका. माणुसकी आणि प्रेम हे इस्लाम धर्माचे मूळ स्त्रोत आहेत. समाजात माणुसकीचा धर्म वाढवा, असे आवाहन येथील मौलाना झिया उल हक यांनी केले. शहरातील मुस्लिम बांधवांनी मंगळवारी ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा केली. त्यावेळी मौलाना हक यांनी समाजाला उद्देशून हा संदेश दिला.
पहाटेपासूनच मुस्लिम कुटुंबात सणाची लगबग सुरू होती. नवीन कपडे, पारंपरिक वेश आणि अत्तराचा दरवळ यामुळे वातावरणात सुगंध पसरला होता. सकाळी आठ वाजल्यापासून ईदगाह मैदानावर गर्दी होऊ लागली. सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. नमाज अदा झाल्यावर एकमेकाला अलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. अनेक हिंदू बांधवांनी सोशल मीडियाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. हिंदू संस्कृतीमधील महत्त्वाच्या सणापैकी अक्षय्य तृतीयेचा सण असल्यामुळे मुस्लिम बांधवांकडून अक्षय्य तृतीयेच्या, तर हिंदू बांधवांकडून ईदच्या शुभेच्छा देण्याचा योगायोग या निमित्ताने आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54634 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top