तीस गुंठ्यात कलिंगडचे अडीच लाखाचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीस गुंठ्यात कलिंगडचे अडीच लाखाचे उत्पन्न
तीस गुंठ्यात कलिंगडचे अडीच लाखाचे उत्पन्न

तीस गुंठ्यात कलिंगडचे अडीच लाखाचे उत्पन्न

sakal_logo
By

19042
नूल : राकेश शेलार यांनी आपल्या शेतात घेतलेले कलिंगडाचे उत्पादन.

तीस गुंठ्यात अडीच लाखांचे उत्पन्न
नूलचा युवा शेतकरी; कलिंगड शेतीतून आर्थिक उन्नती
विठ्ठल चौगुले : सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ३ : पारंपरिक ऊस शेतीला फाटा देऊन येथील युवा शेतकऱ्याने कलिंगड शेतीची कास धरली. अवघ्या तीस गुंठ्यात अडीच लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. राकेश शेलार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जिद्दीला पीक पद्धतीतील बदलाची जोड देत राकेशने अन्य शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वातावरणात सतत होणारा बदल आणि अवकाळी पावसाचा सामना करीत शेतीतून मिळवलेले उत्पन्न कौतुकास्पद आहे.
राकेश शेलार सामान्य कुटुंबातील. त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेतीत लक्ष घातले. ते नेहमी ऊस शेती करायचे, पण उसाला येणारा खर्च आणि तोडणीसाठी लागणारा वेळ यांचा त्यांना खूप वाईट अनुभव आला. त्यामुळे गेल्यावर्षी त्यांनी १२ गुंठ्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर कलिंगडची शेती केली. गतवर्षी कोरोनाचा लॉकडाऊन असतानादेखील दारात कलिंगड विकून एक लाखाचे उत्पादन घेतले. त्यामुळे या शेतीतील त्यांची आवड वाढत गेली.
यंदा माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील सोमेश्‍वर रोपवाटिकेतून ४२०० रोपे आणून कृषी फाउंडेशनचे रोहित बोरगावे यांच्या मार्गदर्शनाने शेतीचे नांगरट करून साडेचार फुटी सरी सोडली. दीड फुटाला एक रोप या पद्धतीने लावून घेतले. ड्रीप पद्धतीने दररोज अर्धा तास असे पहिले पंधरा दिवस व नंतर एक तास पाणी दिले. एक फळ दोन किलोपासून सात किलो वजनापर्यंत धरले. यासाठी एकूण ७० हजार इतका खर्च झाला. त्यातून २५ टनाचे उत्पादन मिळाले. केवळ दोन महिन्यांमध्ये मुंबई, गोवा आणि कर्नाटकातील दावणगिरी येथील व्यापाऱ्यांनी शेतात येऊन काटा पेमेंट देऊन कलिंगडाची उचल केली ही समाधानाची गोष्ट आहे.
--------------
कोट
ऊस शेतीसाठी लागणारे कष्ट, उत्पादन खर्च आणि निसर्गात होणारे बदल लक्षात घेतले, तर आता शेतकऱ्याने बदलण्याची नितांत गरज आहे. एकच पीक घेण्यापेक्षा वेगवेगळी पिके आलटून पालटून घेतली पाहिजे. योग्य नियोजन आणि कृषी क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन जर शेती केली तर अधिक उत्पादन मिळू शकते. कमी कष्ट, कमी दिवसात उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी कलिंगड शेतीकडे वळावे.
- राकेश शेलार, नूल, गडहिंग्लज

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54637 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top