कोल्हापूर : मुख्यमंत्री निधीतून अर्थसाहाय्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for financial assistance from CM fund
मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्याची मागणी

कोल्हापूर : मुख्यमंत्री निधीतून अर्थसाहाय्याची मागणी

गडहिंग्लज : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील अपघातग्रस्त कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी, अशी मागणी जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
नांगनूर येथील कै. संगीता कांबळे, अजित कांबळे, गिरिजा कांबळे यांचा ३ जून २०२१ रोजी पोल्ट्रीची भिंत अंगावर पडून मृत्यू झाला होता. मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे ही घटना घडली होती. कै. अर्जुन व गिरिजी यांचे कृषी विभागातर्फे गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजना अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव पाठविलेले आहेत. पण, अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही.

संगीता यांना सात मुली आहेत. तर त्यांचे पती बसाप्पा शारीरिकदृष्ट्या विकलांग आहेत. अजित व गिरिजा यांचा कुटुंबाला मोठा आधार होता. पण, या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाल्यामुळे सारे कुटुंब वाऱ्यावर आले आहे. गिरिजा यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्यांच्या दोन मुलांची जबाबदारीही बसाप्पा यांच्यावर आहे. या परिस्थितीचा विचार करुन कांबळे परिवाराला मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. जय जवान जय किसान फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी कांबळे कुटुंबासह निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54644 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top