
‘उज्ज्वल’ योजनेमुळे महिलांची गैरसोय दुर शिंदे-नेसरीकर
19080
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. अनिल कुराडे यांचा सत्कार करताना जे. वाय. बारदेस्कर. शेजारी प्रा. किसनराव कुराडे, शंकरराव नंदनवाडे, अॅड. दिग्विजय कुराडे, डॉ. एस. एम. कदम आदी.
अनिल कुराडे यांचा
वाढदिवस उत्साहात
गडहिंग्लज, ता. ५ : येथील शिवराज महाविद्यालयाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांचा वाढदिवस उत्साहात झाला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाजी विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. केशव राजपुरे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ए. बी. कुंभार यांनी स्वागत केले. शिवराज विद्या संकुल व जयहिंद फौंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार झाला. डॉ. रंगराव हेंडगे लिखित कर्ते सुधारक या पुस्तकाचे एनसीसी कॅडेटना प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. शिवराज विद्या संकुलातर्फे डॉ. कुराडे यांचा सत्कार झाला. प्रा. कुराडे, डॉ. राजपुरे, संस्थेचे उपाध्यक्ष जे. वाय. बारदेस्कर, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, डॉ. सलील राजगुरु, ईश्वर देसाई, बसवराज आजरी, डॉ. नंदकुमार कोल्हापुरे, प्रा. बिना कुराडे, मुख्याध्यापिका गौरी शिंदे, पर्यवेक्षक तानाजी चौगुले, डॉ. महेश चौगुले, डॉ. रंगराव हेंडगे, कुमार पाटील यांची भाषणे झाली. डॉ. कुराडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अॅड. दिग्विजय कुराडे, सोमगोंडा आरबोळे, शंकरराव नंदनवाडे, अॅड. सतीश इटी यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54663 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..