अभूतपूर्व प्रतिसादात वास्तू प्रदर्शनाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभूतपूर्व प्रतिसादात वास्तू प्रदर्शनाची सांगता
अभूतपूर्व प्रतिसादात वास्तू प्रदर्शनाची सांगता

अभूतपूर्व प्रतिसादात वास्तू प्रदर्शनाची सांगता

sakal_logo
By

19085
19086
---------
‘चेंबर’चे फॅसिलीटी सेंटर सुरू करू
ललित गांधी; इचलकरंजीत वास्तू प्रदर्शनाची सांगता; कारंडे ई बाईकचे विजेते

इचलकरंजी, ता. ३ ः वास्तू प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्राला बुस्टर डोस मिळाला आहे. विविध सहा संघटनांनी अल्पावधीत हे प्रदर्शन आयोजीत करुन एक आदर्श निर्माण केला आहे. आता शहरातील औद्योगिक, व्यापारी संघटनांची एक व्यापक बैठक घ्यावी. त्यांच्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सचे एक फॅसिलीटी सेंटर इचलकरंजीत सुरु करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज, मुंबईचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.
येथील केएटीपी ग्राऊंडवर क्रेडाई- इचलकरंजी, बिल्डर्स असोसिएशन - इचलकरंजी, इंजिनिअर्स अॅन्ड आर्किटेक्ट असोसिएशन, सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वास्तू २०२२ हे प्रदर्शन आयोजीत केले होते. अभूतपूर्व प्रतिसादात या प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी श्री. गांधी बोलत होते. माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी काढलेल्या लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रीक बाईकचे बक्षीस पुंडलीक कारंडे या भाग्यवान विजेत्यास लागले. टीव्ही संचचे बक्षिस शंकर कांबळे यांना लागले. यासह विविध बक्षिसाचे मानकरी ठरलेल्यांना समारोप कार्यक्रमात बक्षिसांचे वितरण केले. प्रास्ताविक वास्तू कमिटी चेअरमन नितीन धूत यांनी केले. प्रदर्शन दरम्यान, माजी आमदार सुरेश हाळवणकर व प्रदेश राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, काँग्रेसचे राहूल खंजीरे, माजी नगराध्यक्ष हिंदूराव शेळके, अनिल डाळ्या यांच्याहस्ते लकी ड्रॉ काढले. सुत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले. आभार मयूर शहा यांनी मानले.
विवेक सावंत, संजय रुग्गे, मयूर शहा, अनिल मनवाणी, संदीप जाधव, बळिराम घायतिडक, रमेश मर्दा, विकास चंगेडिया, फैयाज गैबान, सुधाकर झोले, तानाजी हराळे, शितल काजवे, मोहित गांधी, प्रितिश शहा, घनशाम सावलानी यांनी प्रर्दशन आयोजनासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54670 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top