महाराष्ट्र दिन कामगार दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र दिन कामगार दिन
महाराष्ट्र दिन कामगार दिन

महाराष्ट्र दिन कामगार दिन

sakal_logo
By

महाराष्ट्र दिन विविध उपक्रमांनी
इचलकरंजी ः शहर व परिसरात महाराष्ट्र दिन व कामगार दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. ध्वजवंदनासह विविध कार्यक्रम झाले. प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या हस्ते ध्वजवंदन केले.
- राष्ट्र सेवा दल
शिवतीर्थ येथे राष्ट्र सेवा दलातर्फे हातात पांढरे कापड, फलक ड्रेस परिधान करून शांतीचा संदेश दिला. यावेळी काही काळ कुठलीही भाषणे, चर्चा, गाणी, आवाहन न करता शांतपणे उभे राहून अभियान झाले.
- न्यू हायस्कूल
न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजतर्फे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्राच्या पराक्रमी परंपरेची माहिती सांगून राज्याच्या आध्यात्मिक व वैचारिक विचारांना उजाळा दिला. अथर्व कोळी याने शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.
- शहापूर हायस्कूल
शहापूर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एच. आर. कांबळे यांनी ध्वजवंदन केले. ताराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिकांच्या हस्ते ध्वजवंदन केले. आंतरभारती विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते राहिमान खलिफा यांनी ध्वजवंदन केले. आंतरभारती वार्षिक हस्तलिखित अंकाचे प्रकाशन केले.
- आयटक कामगार कार्यालय
आयटक कामगार कार्यालयामध्ये ऑल इंडिया फेडरेशनचे गिरीश फोंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. हणमंत लोहार, दादासाहेब जगदाळे, विष्णू चव्हाण, मीना भोरे, दादू मगदूम, वर्षा जाधव उपस्थित होते.
- गंगामाई गर्ल्स हायस्कूल
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये कामगार नेते सदा मलाबादे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यांनी कामगारांची पिळवणूक व कामगार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
हातकणंगले तहसील कार्यालय
हातकणंगले ः हातकणंगले तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त महसूल नायब तहसीलदार दिगंबर सानप यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. पुणे विभागात आयएसओ मानांकनात कोल्हापूर जिल्हा प्रथम आल्याबद्दल रास्त भाव दुकानदारांचा सत्कार केला. तसेच त्यांना सन्मानपत्र दिले. हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार दिगंबर सानप, महसूल नायब तहसीलदार प्रमोद गायकवाड, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54681 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top