रमजान ईद साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमजान ईद साजरा
रमजान ईद साजरा

रमजान ईद साजरा

sakal_logo
By

18969
कोल्हापूर : मुस्लिम बोर्डिंगमध्ये नमाज व दुवा पठण करताना मुस्लिम बांधव.


राष्ट्रीय एकात्मतेसाठी
सामुदायिक दुवा पठण
--
दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात रमजान ईद साजरी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : रमजान ईदनिमित्त आज मुस्लिम बांधवांनी विश्वशांती आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रार्थना केली. दोन वर्षं कोरोनामुळे मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर पाच लोकांच्या उपस्थितीत ईदची नमाज पठण केली होती; मात्र यंदा निर्बंधमुक्त वातावरणात ईदचा सण साजरा झाला. मुफ्ती इरशाद कुन्नुरे, हाफीज आकिब म्हालदार, मौलाना गहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले. पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव, बापूसो मुल्ला आदी उपस्थित होते. संस्थेचे प्रशासक कादर मलबारी यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी आभार मानले. उपाध्यक्ष आदील फरास, संचालक हाजी पापाभाई बागवान, हाजी लियाकत मुजावर, हाजी जहांगीर अत्तार, रफीक शेख, रफीक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्याचे वाटप केले. दरम्यान, शहरातील इतर मशिदीतही नमाज पठण झाले. ईदच्या शुभेच्छा सोशल मीडियावरूनही देण्यात आल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54684 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top