गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

19029
सानिका माने, अर्जुन हरगुडे

न्यू इंग्लिश स्कूलच्या हॉकीपटूंची निवड
नूल : येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या दोन हॉकीपटूंची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. गोवा येथे ११ ते २२ मे दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेसाठी सानिका माने हिची तर ४ ते १५ मे अखेर होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर पुरुष हॉकी स्पर्धेसाठी अर्जुन हरगुडे याची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या निवड चाचणी शिबिरातून या निवडी झाल्या. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक आर. ए. चौगुले, एम. पी. मांगले, खेलो इंडिया हॉकी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक अनिकेत मोरे यांचे मार्गदर्शन, तर संस्थाध्यक्ष कल्लाप्पाणा नडगदल्ली, प्राचार्य जे. डी. वडर, पर्यवेक्षक ए. आर. हिरेमठ यांचे प्रोत्साहन मिळाले.
-------------------
19030
टी. एम. दुंडगे, अनिल चव्हाण

प्रगती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दुंडगे
गडहिंग्लज : येथील प्रगती शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी टी. एम. दुंडगे यांची, तर उपाध्यक्षपदी अनिल चव्हाण यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी आर. जे. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत या निवडी पार पडल्या. अध्यक्षपदासाठी दुंडगे यांचे नाव नारायण सुतार यांनी सुचविले. तर उपाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचे नाव दत्ता देशपांडे यांनी सुचवले. निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा निवडणूक अधिकारी कांबळे यांच्या हस्ते सत्कार झाला. तर कांबळे यांचा प्रणिता कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार झाला. दत्ता देशपांडे व टी. एम. दुंडगे यांची भाषणे झाली. अजित कुलकर्णी, विठ्ठल चौगुले, प्रकाश इंगळे, शंकर कांबळे, संजय कांबळे, सचिव शिवाजी मांगले, राजेंद्र खोराटे यांची उपस्थिती होती.
-----------------
19031
नूल : शिवानुभव चिंतन कार्यक्रमात विद्यार्थिनीचा सत्कार करताना गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी. शेजारी दत्ता देशपांडे, राम पाटील, विठ्ठल चौगुले, विनोद नाईकवाडी आदी.

सिद्धेश्‍वर मठात शिवानुभव चिंतन
नूल : येथील रामपूरवाडीतील सिद्धेश्‍वर मठातर्फे शिवानुभव चिंतन कार्यक्रम झाला. सुरगीश्‍वर मठाचे मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्‍वर महास्वामीजी अध्यक्षस्थानी होते. सिंबायोसिस स्कूलचे माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. देशपांडे म्हणाले, ‘‘मानवी जीवन दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत चाललेले आहे. सार्वजनिक जीवन असो अथवा कौटुंबिक जीवन असो या दोन्ही प्रकारात मानवाला आपापले नियम पाळावे लागतात. परस्परातील प्रेमामुळेच त्यांचे जीवन समृद्धीकडे जाते.’’ श्री गुरु सिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘गुरुंची सेवा म्हणजेच ईश्‍वराची सेवा असते. गुरुंच्या सेवेतून माणुसकी दर्शन होते. आई-वडील हेच आपले दैवत असून त्यांची सेवा जो कोणी करतो तो जीवनात यशस्वी होतो.’’ आनंद शास्त्री, राम पाटील यांचीही भाषणे झाली. प्रारंभी मठातील शिष्य गणांतर्फे प्रार्थना करून वेदघोषाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विनोद नाईकवाडी यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार विठ्ठल चौगुले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गुरुसिद्धेश्‍वर महास्वामीजी यांच्या हस्ते दत्ता देशपांडे, प्रतिभा देशपांडे, राम पाटील, विठ्ठल चौगुले, महानंदा चौगुले, आरटीओ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल उमेश खोत, राष्ट्रीय पातळीवरील हॉकी खेळाडू समीक्षा शेगुणशी, स्नेहा कदम, स्नेहल चव्हाण, शिवानी जाधव, अनिकेत केसुरे, सुरेश बोरगल्ली, सुरेश कंकणवाडी, सारथी शिष्यवृत्तीचे विद्यार्थी शेखर कुरणे यांचा सत्कार करण्यात आला. संजय थोरात यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54691 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top