गडहिंग्लजला मिरवणूक, मर्दानी प्रात्यक्षिकांनी शिवजयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला मिरवणूक, मर्दानी प्रात्यक्षिकांनी शिवजयंती
गडहिंग्लजला मिरवणूक, मर्दानी प्रात्यक्षिकांनी शिवजयंती

गडहिंग्लजला मिरवणूक, मर्दानी प्रात्यक्षिकांनी शिवजयंती

sakal_logo
By

19113
गडहिंग्लज : शिवजयंतीनिमित्त संघर्ष ग्रुपतर्फे काढलेल्या कलश मिरवणुकीतील महिला तर दुसऱ्या छायाचित्रात शिवाजी चौकात मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करताना मुली.

मिरवणूक, मर्दानी प्रात्यक्षिकांनी शिवजयंती
लाईट शो लक्षवेधी; महिला, युवकांचा मोठा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : कलश घेतलेल्या महिला, बैलजोड्या, घोडे यांच्या सहभागाने यंदा संघर्ष ग्रुपची शिवजयंती मिरवणूक लक्षवेधी ठरली. शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे शंभुराजे मंडळातर्फे मर्दानी प्रात्यक्षिके, हँगिंग लाईट शो आकर्षणाचा केंद्र ठरले. परिणामी, सायंकाळी सुरू झालेल्या मिरवणूक आणि लाईट शोने शहर परिसर दणाणून गेला. मिरवणूक, लाईट शो पाहण्यासाठी मोठी गर्दी होती.
संघर्ष ग्रुपतर्फे सायंकाळी सहा वाजता म. दु. श्रेष्ठी विद्यालयापासून मिरवणुकीला सुरवात झाली. ‘गोकुळ’चे संचालक नाविद मुश्रीफ, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. संघर्ष ग्रुपचे अध्य़क्ष गुंडू पाटील यांनी स्वागत केले. संकेश्र्वर मार्ग, दसरा चौक, लक्ष्मी रोड, नेहरू चौक, शिवाजी चौक मार्गे मिरवणूक ताशिलदार गल्लीत विसर्जित झाली. सुमारे अडीच तास मिरवणूक चालली. मिरवणुकीत सुमारे पाचशेहून अधिक महिला, दोन डझनहून अधिक बैलजोड्या, डझनभर घोडे यासह पुण्याहून आणलेल्या लाईट शोमुळे मिरवणुकीत रंग भरला.
शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे दिवसभऱ कार्यक्रम झाले. सकाळी सहा वाजता शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला महाअभिषेक घालण्यात आला. सात वाजल्यापासून प्रसाद वाटप करण्यात आला. सर्व ज्योतींचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत झाले. चौकातर्फे प्रतापराव गुजर स्मारक (नेसरी) येथून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, बंटी कोरी, बाळासाहेब भैस्कर, दत्तात्रय चव्हाण, शिवाजी रेडेकर, अमित पाटील उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता शंभुराजे मंडळातर्फे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर हँगिंग लाईट शोने सारा परिसर प्रकाशमय झाला. तरुणाई या प्रकाश यंत्रणेवर थिरकली.
------------
चौकट..
राजकीय चढाओढ..
शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने नदिवेस परिसरातील दोन मंडळांत चढाओढ पहायला मिळाली. मिरवणूक, कार्यक्रम यांच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले गेले. नगरपालिका निवडणुकीतील चुरसच या निमित्ताने पहायला मिळाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54701 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top