रमजान सलोखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमजान सलोखा
रमजान सलोखा

रमजान सलोखा

sakal_logo
By

बिडी कॉलनीत सामाजिक ऐक्याचा आदर्श
हिंदु कुटुंबाला मदतीचा हात ; पोलिसांचाही खारीचा वाटा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः बिडी कॉलनीत परिसरात कष्टकरी राहतात. त्यात एक चहा टपरी चालविणारे हिंदू कुटुंबही राहते. या कुटुंबातील एका किशोरवयीन मुलाला कर्करोगाने ग्रासले आणि हातावरचे पोट असणारे हे कुटुंब हतबल झाले. आज रमजान ईदचे निमित्त साधून परिसरातील नागरिकांनी जुना राजवाडा पोलिसांना सदिच्छा भेटीला बोलवले. तेंव्हा पोलिसांनाही कुटुंबाची आर्थिक विवंचना विचारात घेऊन मदतीचा हात दिला. यात मुस्लिम समाज बांधव व बिडी कॉलनी सुन्नत जमात मज्जिद बिडी कामगार चाळ कमिटी राजोपाध्येनगर यांनी घेतलेला पुढाकार या गरजू कुटुंबाला आधार देण्याबरोबर सामाजिक औदार्य व एकोप्याचा संदेश देणारा ठरला आहे.
मुस्लिम समाजाने कोणताही धार्मिक मतभेद न ठेवता गरजू कुटुंबास मदत करून सामाजिक व धार्मिक एकोपा जपण्याचे काम केलेले आहे. तसेच राजश्री शाहू महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थाने बिडी कॉलनीतील मुस्लिम समाजाने आज तागायत जिवंत ठेवण्याचे काम केलेले आहे. या विषयाची उपस्थितांनी कृतज्ञताही व्यक्त केली.
कमिटीचे अध्यक्ष गुलाब पठाण, सदस्य समीर गवंडी, शकील जत्राटे, फारूक मनेर, इजाज नागरकट्टी, सलीम शेख, जावेद हवालदार, इतर सदस्यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. त्यांनी संबधित कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार दर शुक्रवारी कमिटीतर्फे त्या कुटुंबाला आर्थिक व संसार उपयोगी मदत केली जात आहे.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54702 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top