निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

१९२२५
ओशक सुतार
कोल्हापूर ः कदमवाडी येथील महालक्ष्मीनगरमधील चांदी मूर्ती कारखानदार अशोक शंकरराव सुतार (वय ५४) यांचे शनिवारी (ता.३०) निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.
-
19132
इंदूताई पाटील
कोल्हापूर : कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील इंदूताई बाबूराव पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. वाळवा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक दिवंगत बाबूराव पाटील यांच्या त्या पत्नी होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ४) आहे.
-
19219
शिवाजी सावंत
कोल्हापूर : निवृत सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी शंकरराव सावंत (वय ७९) यांचे निधन झाले. सावंत यांची पूर्ण सेवा मुंबई पोलिस दलात झाली. मुंबई क्राईम ब्रँचमध्ये सेवेत असताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचा नावलौकिक होता. रक्षाविसर्जन गुरूवारी (ता. ५) आहे.
-
19222
समाधान वाघमारे
कोल्हापूर : दौलत नगर येथील समाधान अर्जुन वाघमारे (वय 32) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. जलदान विधी बुधवारी (ता. 4) आहे.
-
18937
सपना पोवार
कोल्हापूर : कळंबा, निवडे गल्ली येथील सौ. सपना विजय पोवार (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, आई, भाऊ, बहिण, सासू, सासरे असा परिवार आहे.
-
18939
जनार्दन परिट
कोल्हापूर : संत बाळुमामा देवस्थान आदमापूर येथील सेवेकरी जनार्दन विठ्ठल परिट (वय ६७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ४) आहे.
-
२०६०
गणेश माळी
पेठवडगाव : येथील गणेश केशव माळी यांचे निधन झाले. ‘स्मॅक’ आयटीआयमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, वडील असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ५) आहे.
-
२९३४
गोविंद कुरणे
धामोड : कुरणेवाडी (ता. राधानगरी) येथील गोविंद महादेव कुरणे गुरूजी (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
२४८९
बापू सुतार
कळे : निवाचीवाडी (ता. पन्हाळा) येथील बापू बाळकू सुतार ( वय ८५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
-
२४८७
अशोक इनामदार
कळे : घरपण (ता.पन्हाळा) येथील अशोक बजरंग इनामदार यांचे निधन झाले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग विभागाचे ते सेवानिवृत्त अधिक्षक होत. त्यांच्या मागे पत्नी,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
-
२४८५
बंडोपंत मोळे
कळे : घरपण (ता.पन्हाळा) येथील बंडोपंत ज्ञानू मोळे (वय ८२) यांचे निधन झाले. ज्ञानू मोळे विकास संस्थेचे ते माजी संचालक होत. कुंभी कारखाना कामगार सोसायटीचे सचिव श्रीकांत मोळे व तिसंगी (ता.गगनबावडा) प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय मोळे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ४) आहे.
-
३३९२
अक्काताई चव्हाण
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील श्रीमती अक्काताई बापुसो चव्हाण यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ५) आहे.
-
१९२०९
सुभद्रादेवी माने
इचलकरंजी : येथील श्रीमती सुभद्रादेवी काकासाहेब माने यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुली, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या त्या चुलत सासू होत. रक्षाविसर्जन उद्या (ता. ४) आहे.
-
02491
प्रमोद माळवे
कळे: येथील प्रमोद प्रकाश माळवे (वय ३१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, भाऊ आई-वडील व चुलते असा पारिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.४) आहे.
-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54710 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top