यिन समर यूथ समिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन समर यूथ समिट
यिन समर यूथ समिट

यिन समर यूथ समिट

sakal_logo
By

लोगो- आजच्या बातमीतून पान ५ अंक


19148
19149
19151

यिन समर यूथ समिटला
आजपासून प्रारंभ
----
‘चला, घडू देशासाठी,’ सलग दोन दिवस तरुणाईंचे होणार मंथन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : सामाजिक स्वास्थ्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी पुढे यावे, या विचारातून ‘यिन’चे ‘चला घडू देशासाठी’ या यूथ समिटचे आयोजन बुधवारपासून (ता. ४) केले आहे. या ‘समिट’च्या माध्यमातून राज्यातील लाखो युवक एकत्रित येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत विचारविनिमय करणार आहेत. येथील स्वामी विवेकानंद कॉलेजच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात दोन दिवस ही परिषद होणार आहे.
उद्या (ता. ४) सकाळी ११ वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होईल. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सीईओ कौस्तुभ गावडे, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. शीतलकुमार रवंदळे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, युनिक ॲकॅडमीचे एक्झिक्युटिव्ह कोर्स डायरेक्टर प्रवीण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर प्रसिद्ध क्रिएटिव्ह डिझायनर अनंत खासबारदार संवाद साधतील. त्यानंतरच्या विविध सत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी, शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेते रमेश परदेशी, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, संदीप नरके, उदय गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गायक मंगेश बोरगावकर, सावनी रवींद्र, ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अमोल कोडोलीकर आदी तरुणाईशी संवाद साधतील.
गुरुवारी (ता. ५) जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, ‘स्टोरी टेल’चे संस्थापक योगेश दशरथ, विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे, योगशिक्षिका प्राजक्ता कुलकर्णी, कालिदास पाटील, सचिन कुंभोजे आदी तरुणाईशी संवाद साधतील. समिटला युनिक ॲकॅडमी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन ऋतुराज पाटील फाउंडेशन, आमदार जयश्री जाधव, विवेकानंद शिक्षण संस्था, नरके पन्हाळा पब्लिक स्कूल, ॲस्टर आधार हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54714 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top