
गोकुळ संचालक निवड
19228
19229
19230
गोकुळच्या स्वीकृत संचालकांची निवड
निवडीवर शिक्कामोर्तब; युवराज पाटील, मुरलीधर जाधव, विजयसिंह मोरेंना संधी; समर्थकांचा जल्लोष
कोल्हापूर, ता. ३ : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) स्विकृत संचालक पदी राष्ट्रवादीकडून शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, कॉंग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील यांचे कार्यकर्ते विजयसिंह पाटील आणि शासन नियुक्तवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना गोकुळचे स्विकृत संचालक म्हणून आज शिक्का मोर्तब करण्यात आले. गोकुळच्या ताराबाई पार्क येथील संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तिन्ही स्विकृत संचालकांच्या कार्यकत्यांनी जल्लोष केला. गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
गोकुळ संघात संध्या २१ संचालक आहे. यापैकी महाविकास आघाडी प्रणित १७ संचालक तर ४ विरोधी गटाचे संचालक आहेत. आता या तीघांना स्विकृत म्हणून घेतले आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीकडून युवराज पाटील यांचे नाव सूचवले तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी विजयसिंह मोरे यांचे नाव सूचवले आहे. गोकुळ संचालक पदासाठी गेली अनेक वर्ष विजयसिंह मोरे इच्छुक होते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारीही मागितली होती. पण त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे स्विकृत संचालकपदी त्यांच्याच नावाला पसंती दिली आहे. तर, शिवसेनेकडून मुरलीधर जाधव यांना शासन नियुक्त संचालक म्हणून गोकुळमध्ये मिळाली होती. दरम्यान, यांना स्विकृत करुन घेण्यास अडथळे आले होते. त्यामुळे जाधव यांनी आंदोलनही केले. त्यानंतर त्यांना शासनाकडून सुचना आल्यानंतर नियुक्त करुन घेतो अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर आज त्यांना स्विकृत म्हणून अधिकृतरित्या गोकुळमध्ये संचालक म्हणून संधी दिली आहे. या नूतन संचालकांना मंगळवारी (ता. १७) त्यांना बैठकीसाठी बोलावून त्यांचा सत्कार केला जाईल, असे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.
स्वीकृत संचालक असे :
युवराज दत्ताजीराव पाटील (मौजे सांगाव, ता. कागल), विजयसिंह कृष्णाजी मोरे (सरवडे, ता. राधानगरी) व शासन नियुक्त संचालक मुरलीधर रघुनाथ जाधव (हुपरी, ता. हातकणंगले).
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54735 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..