सेवानिवृत्ती सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्ती सत्कार
सेवानिवृत्ती सत्कार

सेवानिवृत्ती सत्कार

sakal_logo
By

२८७१
कोलोली केंद्रशाळेत सदिच्छा समारंभ
पुनाळ : कोलोली (ता. पन्हाळा) येथील केंद्रशाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ झाला. स्वागत मुख्याध्यापक एल. बी. पोवार, प्रास्ताविक वर्गशिक्षक अनिल आंगठेकर यांनी केले. अध्यक्ष अजय पाटील प्रमुख पाहुण्या शैलजा गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शाळेला डायस भेट दिले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमर बचाटे, संजय गावडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संतोष जायभाय, अरुणा वसावे, सुवर्णा कणसे तसेच उपाध्यक्ष संदीप पाटील, संजय सुतार, जयसिंग गुरव व सदस्या सविता माने, कोमल गुरव उपस्थित होते. आभार अजय दाभोळकर सर यांनी मानले.

मळाईदेवी सेवा संस्था बिनविरोध
तुरुकवाडी ः मालगाव (ता. शाहूवाडी) येथील मळाईदेवी विकास सेवा संस्था बिनविरोध झाली. संस्थेवर माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व मानसिंगराव गायकवाड गटाची सत्ता आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष व कर्णसिंह गायकवाड गट ४ तर मानसिंगराव गायकवाड व माजी आमदार सरूडकर गट ८ असे सदस्य बलाबल आहे. सदस्य असे ः आनंदराव राजाराम पाटील, चंद्रकांत नारायण पाटील, अशोक बाबूराव साळवी, दगडू भाऊ पाटील, प्रकाश वसंत दळवी, राजाराम पांडूरंग मतरे, मारुती राजाराम पाटील, अनुसया आनंदा पाटील, शंकर हरी पाटील, शंकर श्रीपती पाटील, विश्वास गुंडा बनसोडे व कमल हरीबा पाटील. बिनविरोध निवडीकामी डी. के. पाटील, डी. जी. पाटील, सुभाष आगलावे, टी. सी. पाटील, बाजीराव डिगे यांनी विशेष प्रयत्न केले.

गलगलेतील श्रीराम संस्था बिनविरोध
नानीबाई चिखली ः गलगले (ता. कागल) येथील श्रीराम विकास सहकारी सेवा संस्थेची निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध झाली. संस्थेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता आहे. नूतन संचालक मंडळात ज्ञानदेव पिराजी पाटील, मनोहर भैरव पाटील, आनंदा निवृत्ती देशमूख, बाळासो दत्तू पाटील, सर्जेराव पांडूरंग पाटील, आबासो पुंडलिक पाटील, आप्पासो हरी पडळकर, दस्तगिर आदम पठाण, महादेव शामराव बांबरे, साताप्पा परसू कांबळे, अंजली विजय घोरपडे, शालन मधूकर डावरे यांचा समावेश आहे. तालूका संघाचे संचालक डी. पी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच काका पाटील, उपसरपंच सतिश घोरपडे, मारुती मगदूम यांनी बिनविरोधसाठी सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी ए. आर. होते. सचिव बाळकृष्ण बांबरे, लिपीक सागर मांगले यांनी सहकार्य केले. केडीसीसी बँक निरीक्षक संदीप पाटील यांनी आभार मानले.

02274
02273
केदारलिंग संस्थेच्या अध्यक्षपदी भांदिगरे
गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी अशोकराव साताप्पा भांदिगरे व उपाध्यक्षपदी शशिकांत बजरंग कोराणे यांची बिनविरोध निवड केली. सहायक निबंधक एस. एस. पाटील निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संचालक भिकाजी शेणवी व श्री. लिंबाजी कुपटे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक कृष्णात तेलंग, लिबाजी कुपटे, दीपक पाटील, भिकाजी शेणवी, सुरेश व्हरांबळे, सुरेश पाटील, बळवंत कुपटे, विलास कांबळे, वसंत लोहार, सौ. विजयमाला हुंदळकर, सौ. इंदूबाई पोवार, सचिव महावीर बोरगावे, शिवाजी कडव व नामदेव हुंदळकर उपस्थित होते.

18513
ग्रंथपाल उपासेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार
गारगोटी : येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्‍हिल अँन्ड रुरल इंजिनिंअरिंगचे (आयसीआरई) ग्रंथपाल चंद्रकांत उपासे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य जयंत घेवडे होते. दीपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. संभाजी आरडे यांच्या हस्ते उपासे यांचा चांदीची गणेशमुर्ती, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्राचार्य घेवडे म्हणाले, ‘‘संस्थेची ग्रंथसंपदा सुरक्षित जपण्यात उपासे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. मौनी विद्यापीठ कर्मचारी प्रतिनिधी प्रा. दीपक खोत, प्रशिक्षण अधिकारी प्रा. एस. ए. मुल्ला, विभागप्रमुख प्रा. ए. आर. भोसले, प्रा. अरविंद कदम, प्रा. डी. जे मगदूम, श्री आरडे यांची भाषणे झाली. प्रा. आर. डी भोकरे, प्रा. एस. एस. रायमाने, प्रा. संतोष माने, कार्यालय अधिक्षक आर. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. तुषार जाधव यांनी आभार मानले.

१९९६
विद्यार्थ्याचा पालकांना सानुग्रह अनुदान
कोडोली : मागील वर्षी विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या शिवराज कृष्णा साळोखे याच्या पालकांना राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदानातून ७५ हजारचा धनादेश यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. आर. पाटील यांच्या हस्ते प्रदान केला. येथील यशवंत हायस्कूलचा विद्यार्थी शिवराज कृष्णात साळोखे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पालकांना राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदानातून आलेली रक्कम मुख्याध्यापक आर. आर. पाटील यांच्या हस्ते व अशोक महापुरे, एस. एल. सुतार यांच्या उपस्थितीत दिली. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर, विस्तार अधिकारी बाजीराव कांबळे यांचे सहकार्य तर मंडळाच्या अध्यक्षा पद्मजा पाटील, सचिव डॉ. जयंत पाटील, विश्वस्त विनिता पाटील, मानद सचिव वसंत पाटील प्रशासकीय अधिकारी पुंडलिक पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54743 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top