लुगडे यांनी बांधिलकी जपली : अशोक चराटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लुगडे यांनी बांधिलकी जपली : अशोक चराटी
लुगडे यांनी बांधिलकी जपली : अशोक चराटी

लुगडे यांनी बांधिलकी जपली : अशोक चराटी

sakal_logo
By

19143
एरंडोळ (ता. आजरा) : शिवाजी लुगडे व त्यांच्या पत्नी यशोदा यांचा सत्कार करताना अशोक चराटी, सुरेखा भालेराव. या वेळी उपस्थित विलास नाईक, कृष्णा येसणे, आय. के. पाटील, दिलीप भालेराव व मान्यवर.

लुगडे यांनी बांधिलकी
जपली : अशोक चराटी
आजरा, ता. ४ : शिवाजी लुगडे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या सेवेत शैक्षणिक कामाबरोबर सामाजिक बांधिलकीही जपली, असे गौरवोद्गार जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी काढले. एरंडोळ हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी लुगडे सेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त आयोजित निवृत्ती सभारंभात चराटी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक, संचालक कृष्णा येसणे, सरपंच सुजाता तळेवाडीकर, सल्लागार आय. के. पाटील, दिलीप भालेराव, सुरेखा भालेराव प्रमुख उपस्थित होते.
एस. पी. होलम यांनी मानपत्राचे वाचन केले. यानंतर मुख्याध्यापक लुगडे व त्यांच्या पत्नी यशोदा लुगडे यांचा चराटी व भालेराव यांच्या हस्ते सत्कार झाला. ग्रामस्थ, एरंडोळ परिसरातील विविध संस्था व माजी विद्यार्थांच्या हस्तेही सत्कार झाला. येसणे म्हणाले, ‘‘लुगडे हे व्रतस्थ शिक्षक आहेत. त्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबर दांडगा लोकसंग्रह जपला आहे. त्यांचे कार्यप्रेरणादायी असेच आहे.’’ या वेळी श्रीकांत पाटील, नामदेव पाटील, निवृत्ती पाटील व विद्यार्थ्यांची भाषणे झाली. या वेळी माजी सरपंच एकनाथ पाटील, अश्‍विन पाटील, भीमराव माधव, विष्णू भोगण, भिकाजी पाटील, सुभाष पाटील, अजित चौगुले, अनिल पाटील, पी. बी. पाटील, इनास फर्नांडिस, शिक्षक, पालक, विद्यार्थी, लुगडे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54744 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top