दाभिलच्या उपसरपंचपदी सागर कांबळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभिलच्या उपसरपंचपदी सागर कांबळे
दाभिलच्या उपसरपंचपदी सागर कांबळे

दाभिलच्या उपसरपंचपदी सागर कांबळे

sakal_logo
By

19157
सागर कांबळे

दाभिलच्या उपसरपंचपदी सागर कांबळे
आजरा ः दाभिल (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमृता गवळी होत्या. उर्मिला पाटील यांनी कार्यकाल पुर्ण होताच राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. उपसरपंच पदासाठी कांबळे यांचे नाव ग्रामपंचायत सदस्या सुनंदा गुरव यांनी सुचवले. ग्रामपंचायत सदस्या उर्मिला पाटील यांनी अनुमोदन दिले. मान्यवरांच्या हस्ते कांबळे यांचा सत्कार झाला. कांबळे यांनी सर्वांना विश्‍वासात घेवून काम करणार असल्याचे सांगितले. या वेळी ग्रामपंचायत सदस्या सुनंदा पाटील, शोभा पाटील, श्रीपती पाटील, महेश सुतार यांच्यासह कारखाना संचालक आनंदा गवळी, दिपक गवळी, अनिल नार्वेकर, शांताराम पाटील, संभाजी गुरव यांच्यासह ग्रामसेवक डोंगरे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54755 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top