रिषम सॉलिटेअर भूमीपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिषम सॉलिटेअर भूमीपूजन
रिषम सॉलिटेअर भूमीपूजन

रिषम सॉलिटेअर भूमीपूजन

sakal_logo
By

19164

रिषभ सोलिटेअर
गृहप्रकल्पाचे भूमिपूजन

कोल्हापूर, ता. ३ ः येथील रिषभ बिल्डर्सने सातत्याने दर्जेदार गृहप्रकल्प साकारले असून, रिषभ सोलिटेअर प्रकल्पामुळे शहराचा नावलौकिक वाढेल, असे गौरवोद्गार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी काढले. जयेश ओसवाल आणि सुनील पटेल यांच्या शास्त्रीनगर येथील नवीन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, महाराष्ट्र चेंबरचे ललित गांधी, राजू पारिख, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, यशराजराजे छत्रपती आदी प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूरच्या विकासासाठी बाहेरून उद्योजक येणे आणि येथे गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. ॲस्टर आधार हॉस्पिटल परिसरातील हा प्रकल्प दहा मजली असून, कोल्हापूर आणि महाराष्ट्र क्रेडाई नेहमी विकसकांच्या पाठीशी असल्याचे ओसवाल यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनीही प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, धृव पटेल, भगवानजी पटेल, प्रवीणसिंह घाटगे, प्रदीपभाई कापडिया, शंकर पाटील, शंकर दुलानी, माजी आमदार सुजीत मिणचेकर,आनंद माने, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. मोनिका जाजू यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54761 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top