
बसव जयंती उत्सव
१९१५५
शिव-बसव यांच्या कार्याचा जागर
--
वीरशैव समाजातर्फे बसवेश्वर जयंतीनिमित्त मिरवणूक ; महिलांचा लक्षवेशी सहभाग; प्रबोधन फलक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : फुले, रोषणाईनी सजविलेली पालखी, ब्रास बँड पथक, झांजपथक, धनगरी ढोल, लेझीम पथकांचा निनाद, छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शाहू महाराजांचा जयजयकार अशा मंगलमय अन् चैतन्यमय वातावरणात आज वीरशैव लिंगायत समाजातर्फे बसवेश्वर अन् शिवजयंती संयुक्त पद्धतीने साजरी केली. यानिमित्त भव्य मिरवणूक काढली. ‘पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न, काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे, स्वच्छता असे जिथे तिथे आरोग्य वसे तिथे तिथे, असे प्रबोधनात्मक फलक मिरवणुकीत होते.
दसरा चौकासमोरील चित्रदुर्द मठात सायंकाळी निता व संजय नडगदल्ली यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. आमदार श्रीमती जयश्री जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, वैशाली क्षीरसागर, पूजा ऋतुराज पाटील, शुभलक्ष्मी विनय कोरे, उमा बनछोडे आदींच्या उपस्थिती मिरवणुकीस प्रारंभ झाला. दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, महापालिका, काळाईमाम तालीम, गवळी गल्ली, तेली गल्ली, नष्टे गल्ली, शनिवार पोस्ट, टाऊन हॉल मार्गे पुन्हा चित्रदुर्ग मठात मिरवणूक विसर्जित झाली. मिरवणुकीत वीरशैव समाजातीन बांधव सहभागी झाले. महिलांनी पिवळ्या साड्या नेसून सहभाग घेतला. मिरवणूकीच्या मार्गावर रांगोळ्या पालखीचे स्वागत केले.
वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, सचिव राजू वाली, वसंतराव सांगवडेकर, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुहास भेंडे, चंद्रकांत हळदे, अॅड. सतीश खोतलांडे, नानासाहेब नष्टे, राजेश पाटील, किरण सांगावकर, डॉ. गिरीष कोरे, श्रीकांत बनछोडे, गुरुदेव स्वामी, अशोक माळी, गजानन सावर्डेकर, चंद्रकाल नासीपुडे, राहूल नष्टे, धर्मेंद नष्टे, सदाशिव माळकर, भूपाल रंगमाले, गणेश सन्नकी, अमित झगडे, सिद्धांत पाटील, विश्वनाथ बनछाडे, राजशेखर पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता शेटे, माधवी बोधले, सुजाता विभूते, स्मिता हळदे, शैलजा सावर्डेकर, मीना सावर्डेकर, सुनंदा नष्टे, प्रेमा स्वामी, मंदा कुलकर्णी, अमृता करंबळी, मीनाक्षी कदम आदी सहभागी झाले.
--
महिलांचे भजन आणि व्याख्यान
दरम्यान, आज सकाळी चित्रदुर्ग मठात धार्मिक विधी आणि अक्कमहादेवी महिला मंडळातर्फे भजन संगीताचा कार्यक्रम झाला. ‘बसवेश्वराचे जीवन व कार्य’ यावर सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार बन्नवीर भद्रेश्वर मठ यांचे व्याख्यान झाले. दुपारी १२ वाजता बसवेश्वरांचा जन्मोत्सव झाला. रात्री आठ वाजता ज्येष्ठ व्यापारी तात्यासाहेब कापसे, निता व राहूल कापसे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप झाले. ‘रंग सप्तसूरांचे’ हा संगीत रजनी कार्यक्रम झाला. महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवराय जिजाबाई, छत्रपती शाहूंच्या वेशभूषा केलेली लहान मुले घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झाली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54762 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..