मुंबईत राजर्षी शाहू भवन उभारावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत राजर्षी शाहू भवन उभारावे
मुंबईत राजर्षी शाहू भवन उभारावे

मुंबईत राजर्षी शाहू भवन उभारावे

sakal_logo
By

कोल्हापूरकरांसाठी मुंबईत
राजर्षी शाहू भवन उभारावे
राजेश क्षीरसागर; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविला ईमेल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईत राजर्षी शाहू भवन उभारून कोल्हापूरवासियांना वास्तव्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ईमेलच्या निवेदनाद्वारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आज केली.
निवेदनात म्हटले आहे, विविध कामांसाठी जिल्ह्यातून दररोज हजारो नागरिक मुंबईमध्ये दाखल होतात. अनेकवेळेला मुंबईत वास्तव्य करणे अनिवार्य असते. मुंबईसारख्या मेट्रो सिटीत महागडी हॉटेल्स सर्वसामान्यांना परवडणारी नाहीत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तसेच शासनाचे मुख्यालय व प्रमुख कार्यालये मुंबई मध्ये आहेत. कोल्हापूरमधून सामाजिक, न्यायालयीन तसेच वैद्यकीय कामाकरिता मुंबईत येणाऱ्या कोल्हापूर वासियांकरिता मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वास्तव्याकरिता भवन उभारणेची आवश्यकता आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या नावे मुंबई सारख्या ठिकाणी वास्तव्याची व्यवस्था होणे ही राजर्षी शाहू महाराजांना वाहिलेली आदरांजली ठरणार आहे. त्यामुळे कोल्हापूर वासियांकरिता मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वास्तव्याकरिता ‘राजर्षी शाहू भवन’ या नावाचे निवास भवन स्थापन करण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54765 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top