जलप्रदूषण रोखण्यासाठी स्टार्टटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलप्रदूषण रोखण्यासाठी स्टार्टटप
जलप्रदूषण रोखण्यासाठी स्टार्टटप

जलप्रदूषण रोखण्यासाठी स्टार्टटप

sakal_logo
By

चला पंचगंगा वाचवूया लोगो

स्टार्टअप महोत्सवात जलप्रदूषण रोखणारी उपकरणे

कमी खर्चातील सांडपाणी रोखण्यासाठी प्रभावी उपाय; विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सहभाग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः लोकराजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी अंतर्गत शिवाजी विद्यापीठाने लोकराजा स्टार्टअप महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात विविध महाविद्यालये, विद्यार्थी यांनी स्टार्टअपची उत्पादने, प्रयोगांची मांडणी केली. सुमारे १०४ नवीन उपकरणे, स्टार्टअप आहेत. यात जलप्रदूषण रोखण्यासाठीची उपकरणेही आहेत. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणांचा आढावा.


19167
रिव्हर क्लिनिंग स्मार्ट बोट
तीन किलो वजनाचे हे उपकरण आहे. दोन प्लास्टिक पाईपच्या आधाराने हे उपकरण पाण्यावर तरंगते. त्याला दोन पायडर आहेत. पुढील बाजूस कनव्हेअर बेल्ट आहे. बोटीला कॅमेरा बसवला आहे. ही बोट मोबाईलच्या सहाय्याने चालवली जाते. नदी, तलाव किंवा विहिरीत ही बोट सोडली जाते. बोटीच्या कॅमेरामुळे समोरील दृष्य मोबाईलवर दिसते. त्या दिशेला बोट नेऊन तेथील प्लास्टिक कचरा कनव्हेअर बेल्टच्या सहाय्याने बोटीच्या पाठीमागे असणाऱ्या कप्प्यात पडतो. एकावेळी तीन किलो प्लास्टिक कचरा या बोटीच्या सहाय्याने संकलित केला जातो. याच पद्धतीच्या मोठ्या बोटी उपलब्ध आहेत. अथर्व दिंडे, सम्राट मडके, श्रवण वणकुद्रे यांनी बनवलेली ही बोट व्यक्तिगत स्तरावर उपयोगी पडते. विहीर, शेततळी, किंवा नदीतील कचरा गोळा करून बाहेर काढण्यासाठी ही बोट उपयुक्त आहे.


19166
सुनियोजित पाणी
बचत सिस्टीम
घरातील सांडपाण्याचे मोजमाप केले तर शौचालयात पाण्याचा वापर अधिक होतो. फ्लशमुळे एकावेळी सुमारे ४ ते ५ लिटर पाणी खर्च होते. घरात कमोड असल्याने मूत्रविसर्जनासाठीही त्याचाच वापर होतो. जेव्हा फ्लश केले जाते, त्यावेळी आवश्यकता नसतानाही ४ ते ५ लिटर पाणी खर्च होते. दिवसभरातील हिशोब केला तर पाच जणांच्या कुटुंबातील २० लिटर शुद्ध पाण्याचे सांडपाण्यात रूपांतर होते. ही बाब लक्षात घेऊन सुनियोजित पाणी बचत सिस्टीम यांच्यातर्फे एक भांडे बनवले. हे भांडे कमोडच्या सिटवर बसवायचे. या भांड्याला एक पाईप बसवून ती स्वच्छतागृहाच्या मोरी ट्रॅपमध्ये सोडली आहे. मूत्रविसर्जन झाल्यावर अर्धा किंवा एक तांब्याच्या पाण्यात भांडे स्वच्छ होते. दररोजच्या २० लिटर पाण्याची बचत होते. वैशाली ओक यांनी हे उपकरण ठेवले आहे.
-------------------------------

19165
रॅपिड्स सँड फिल्टर
घरगुती स्तरावर जर सांडपाण्यावर प्रक्रिया झाली तर सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण कमी होईल. मात्र सध्या यासाठी जी उपकरणे बाजारात आहेत ती खर्चिक आहेत. इचलकरंजी येथील डीकेटीई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फिल्टर बनवला आहे. काचेच्या मोठ्या टाकीत वाळू, खडी, नारळाच्या करवंटीचे तुकडे, जाळी बसवली आहे. एका बाजूला सांडपाणी टाकीत पडण्यासाठी कनेक्शन असून दुसऱ्या बाजूला प्रक्रिया केलेले पाणी बाहेर येण्यासाठी नळ आहे. शौचालयातील सांडपाणी वगळता इतर सर्व प्रकारच्या सांडपाण्यावर या फिल्टरमध्ये प्रक्रिया केली जाते. सांडपाण्यातील घन पदार्थ वेगळे होतात. प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विविध चाचण्या घेतल्या असता त्यातील क्षारांचे प्रमाण, सामू (पी.एच.), पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन या सर्वांचे प्रमाण चांगले असून हे पाणी पिण्यासही योग्य असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. राहुल पाटील, धीरज पाटील, अभिषेक गिरमल, प्रथमेश हिरवे, धीरज महावीर पाटील यांनी हा फिल्टर बनवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54767 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top