आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार
आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार

आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार

sakal_logo
By

19188
कोल्हापूर : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवर.

कैलासगडची स्वारी मंदिरात
शिवजयंती साजरी

कोल्हापूर,ता ३ : कैलास गडची स्वारी मंदिरातर्फे परंपरेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कलायोगी जी. कांबळे यांनी रेखाटलेल्या तैलचित्राचे पूजन संस्थेच्या विश्वस्त आणि आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष सत्यजित चंद्रकांत जाधव, विश्वस्त सुनीलकुमार सरनाईक, सौ. मंजुश्री गोखले उपस्थित होते. अध्यक्ष श्री. जाधव यांच्या हस्ते पाळणा पूजन झाले. शिवजयंती निमित्त भजन, सुंठवडा वाटप, आतषबाजी केली.
उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत संस्थेच्या विश्वस्त श्रीमती जाधव यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार झाला. सहसचिव विलास गौड यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. सौ. गोखले, सत्यजित जाधव, अजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार जाधव म्हणाल्या "हा जणू माझ्या माहेरचा सत्कार असून तो महत्वाचा आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोल्हापूरचे विकासाचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण करीन अशी मी ग्वाही देतो.’ सचिव अशोक मेस्त्री यांनी आभार मानले. केशव पोवार, अजितराव जाधव, धनाजी जाधव, विठ्ठलराव जाधव, अशोक कांबळे, शिवाजी जाधव, शरद गौड, किशोर भोसले, गणेश भोसले, राजेंद्र जाधव, प्रदीप गौड, अनिल गौड, अजय भोसले, रोहीत कारंडे, विवेक कोरडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54792 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top