शाहू मैदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू मैदान
शाहू मैदान

शाहू मैदान

sakal_logo
By

19208

खासबाग मैदानात
गवताचे सड धोकादायक
कोल्हापूर, ता. ३ ः शाहू खासबाग कुस्ती मैदानात गवतामुळे प्रेक्षकांना बसता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. मैदानातील व्यासपीठाच्या उजवीकडील उतारावर वाढलेले गवत साफ केले असले, तरी त्याचे सड मोठ्या प्रमाणात राहिल्याने उजव्या बाजूच्या बैठक व्यवस्थेत प्रेक्षकांना नीट चालताही येणार नसून, बसण्याची तर गोष्ट दूरच आहे.
मैदानातील कुस्ती प्रेक्षकांना पाहता यावी, यासाठी सभोवताली उतार असलेली बैठक व्यवस्था केली आहे. त्यात मातीच असल्याने छोटे गवत उगवले तरी त्यावर बसताना काहीच अडचण नव्हती. पण, कोरोना काळादरम्यान सर्व ठप्प झाल्याने मैदानाकडेही दुर्लक्ष झाले. गवत इतके मोठे वाढले की ते कापल्यावर जवळपास अर्धा फूट उंचीचे सड राहिले आहेत. उजव्या बाजूच्या बैठकीत त्या सडांच्या गड्ड्यांचे साम्राज्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महापालिकेने गवत कापून घेऊन स्वच्छता केली असली तरी त्याचे सड राहिले आहेत. हे सड इतके मोठे आहेत की त्यातून चालताही येणार नाही. त्यात प्रेक्षक बसूच शकत नाहीत. बऱ्याच कालावधीनंतर कुस्ती स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी स्वच्छता केली असली तरी गवताचे सड मुळातून काढून टाकण्याची गरज निर्माण झाली. तरच त्या मैदानात प्रेक्षकांना बसता येईल.

ट्रॅक्टरची गरज
गवताचे सड पाहिल्यावर ते आता कर्मचाऱ्यांकडून काढता येणे अशक्य आहे. त्यासाठी ट्रॅक्टरद्वारे नांगरण केली तरच ते गड्डे काढणे सोपे होईल. त्यामुळे केवळ स्वच्छता करण्यापेक्षा प्रशासनाकडून त्यादृष्टीने कार्यवाही होण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54793 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top