वाढला ''उन्हाळा'' , गाडी ''सांभाळा'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढला ''उन्हाळा'' , गाडी ''सांभाळा''
वाढला ''उन्हाळा'' , गाडी ''सांभाळा''

वाढला ''उन्हाळा'' , गाडी ''सांभाळा''

sakal_logo
By

फोटो- चारचाकी

लोगो
वाढला उन्हाळा, गाडी सांभाळा- भाग- १

लीड..
वाढत्या उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम जाणवू लागल्यामुळे प्रत्येकजण काळजी घेतो तसेच या उष्णतेचा परिणाम गाड्यांवरही होत आहे. यामुळे गाडीची काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी कशी घ्‍यावी? याची माहिती देणारी मालिका आजपासून...

किरकोळ उपायांनी गाडीची काळजी घ्या
------------------
वाढत्या उष्णतेत इंजिनसह विविध साधने ठेवा अपडेट

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. ४ : चारचाकी गाडी उन्हात तसेच बऱ्याचदा रस्त्यावर उभ्या असल्यावर अचानक पेट घेतल्याच्या घटना घडतात. बऱ्याच घटनांत जीवितहानी झाली आहे. काही किरकोळ पण महत्त्‍वाच्या उपायांनी आपण गाडीची काळाजी घेऊ शकतो. कारचे इंटिरिअर अधिक ज्वलनशील असते. कारच्या आतील डॅशबोर्ड, सीट्स, एसी सिस्टीम यांचा समावेश होतो. बाह्यभागातील टायर्स, वायपर्स, इंजिन, कुलंट सिस्टीम, वायरिंग, होजेस, अशा सर्वच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गाडी सावलीत पार्क करा. तुमच्या वाहनांसाठी कव्हर्ड पार्किंगची व्यवस्था करा. सावली नसेल तर कार कव्हर्स घ्यावे. त्यातून तुमची गाडी उष्णता आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून सुरक्षित राहील. 

कुलंट 
कारमधील कुलंट सिस्टीम-कुलंट ऑईलची तपासणी करणे, होजेसकडे लक्ष देणे, छोटे-मोठे क्रॅक तपासणे सर्व जॉइन्ट्स व्यवस्थित आहेत का? याची खात्री करणे. होज इंजिन ब्लॉकला जेथे जोडला आहे, तो ढिला नसल्याची खात्री करून घेणे. इंजिन थंड असताना होज हातांनी दाबून बघितल्यावर मऊ किंवा स्पंज सारखा वाटत असेल तर बदलून घेणे. 

इंजिनबेल्ट 
मोटारीचा इंजिनबेल्ट जो मोटारीच्या अल्टनेटर, फॅन आणि इतर भागाशी संलग्न फिरत असतो. इंजिनच्या उष्णतेबरोबरच बाह्य उष्णतेमुळे यावर परिणाम होऊन बेल्ट ढिला होणे अथवा अधिक कडक होऊन तुटण्याचे प्रकार घडतात अशामुळे रेडिएटर फॅन न फिरल्याने इंजिनची गर्मी अधिक वाढू शकते. यामुळे गाडी पेट घेऊ शकते. 

फ्लुईड चेक करणे
इंजिन ऑईल, ब्रेक्स तसेच पॉवरस्टेअरिंग आणि विंडशिल्ड वॉशर यांचे फ्लूईड्स तपासून करून घेणे. पातळी नीट राखणे गरजेचे आहे. गाडीचा धूर काळा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 

एअरकंडिशनर सिस्टीम आणि एअर फिल्टर्स 
गाडीत बसल्याबसल्या एसी चालू करणे धोक्याचे ठरू शकते. गाडी बराच वेळ बंद असल्यास अंतर्गत उष्मांक वाढलेला असतो. यामुळे थोडावेळ काचा खाली करून गाडी चालवा. नंतर काचा बंद करा. एसी अचानक अधिक थंड केल्याने तुमच्या कारमधील एचव्हीएसी सिस्टीमवर ताण येतो आणि काहीवेळेस ही सिस्टीम बंद पडते. म्हणून एसी फुल्ल करू नका. एसीचे व्हेंट्स स्वच्छ ठेवा. रेफ्रिजरेशन सिस्टीम व्यवस्थित चालू असल्याची खात्री करून घ्या. गाडीमधील एअर फिल्टर्स वेळेवर साफ करून घ्या. 

बॅटरी तपासणी
गाडीच्या बॅटरीची कंडिशन चांगली असल्याची खात्री करून घ्या. उन्हाळ्यात बॅटरीचा चार्ज वाढलेला असतो. बॅटरी ओव्हरचार्ज होणार नाही, याची काळजी घ्या. उन्हाळ्यात बाष्पीभवन होत असल्याने बॅटरीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बॅटरी वायर्स तपासून घेणे महत्त्‍वाचे आहे.

टायर्स 
टायर्सची स्थिती महत्त्‍वाची आहे. बरेचसे अपघात टायर फुटल्याने होतात. टायरमधील हवेचा दाब नेहमीच तपासून बघावा. टायरमध्ये नायट्रोजन हवा भरावी. गाडीच्या रनिंगमुळे आतील हवा गरम होऊन अधिक प्रसारण पावते यामुळे निर्देशानुसार हवेचा दाब कायम राखावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54802 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top