
बैलगाडी शर्यत
19204
कसबा बावड्यातील शर्यतीत
मधुकर दिवसे यांची बैलगाडी प्रथम
कसबा बावडा, ता. ३ ः येथील सुवर्णमहोत्सवी विजय स्वतंत्र तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित जनरल दुबैलीगाडी शर्यतीत मधुकर दिवसे (नागदेववाडी) यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला, नीलेश बाटे (कसबा बावडा) यांच्या गाडीने द्वितीय, तर बंडा जाधव (कसबा बावडा) यांच्या गाडीने तृतीय क्रमांक पटकावला. शाहू सर्कल ते सर्किट हाऊसमार्गे महासैनिक दरबार हॉल व परत असा शर्यतीचा मार्ग राहिला. यावेळी झालेल्या एक्का गाडी व सुट्टा घोडा शर्यतींचे अनुक्रमे निकाल असे- एक्का गाडी शर्यत- अशोक वडर, पुष्कराज नेजदार, विशाल दळवी. घोडेस्वार शर्यत- रनवीर माने (कसबा बावडा), रियाज शेख (कसबा बावडा) विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेसाठी पंच म्हणून किशोर पाटील, धनाजी गोडसे, सुनील पाटील, प्रल्हाद कदम आदींनी काम पाहिले. शर्यती यशस्वी होण्यासाठी मोहन सालपे, संजय पाटील, शैलेश मोहिते आदींनी परिश्रम घेतले.
..........
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54808 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..