
इचल : निधन वृत्त
२०६०
गणेश माळी
पेठवडगाव : येथील गणेश केशव माळी यांचे निधन झाले. ‘स्मॅक’ आयटीआयमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांनी दीर्घ काळ सेवा बजावली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, वडील असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ५) आहे.
२९३४
गोविंद कुरणे
धामोड : कुरणेवाडी (ता. राधानगरी) येथील गोविंद महादेव कुरणे गुरूजी (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
२४८९
बापू सुतार
कळे : निवाचीवाडी (ता. पन्हाळा) येथील बापू बाळकू सुतार ( वय ८५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
२४८७
अशोक इनामदार
कळे : घरपण (ता.पन्हाळा) येथील अशोक बजरंग इनामदार यांचे निधन झाले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग विभागाचे ते सेवानिवृत्त अधिक्षक होत. त्यांच्या मागे पत्नी,मुलगा, मुलगी असा परिवार आहे. असा परिवार आहे.
२४८५
बंडोपंत मोळे
कळे : घरपण (ता.पन्हाळा) येथील बंडोपंत ज्ञानू मोळे (वय ८२) यांचे निधन झाले. ज्ञानू मोळे विकास संस्थेचे ते माजी संचालक होत. कुंभी कारखाना कामगार सोसायटीचे सचिव श्रीकांत मोळे व तिसंगी (ता.गगनबावडा) प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय मोळे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ४) आहे.
३३९२
अक्काताई चव्हाण
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील श्रीमती अक्काताई बापुसो चव्हाण यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ५) आहे.
१९२०९
सुभद्रादेवी माने
इचलकरंजी : येथील श्रीमती सुभद्रादेवी काकासाहेब माने यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुली, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या त्या चुलत सासू होत. रक्षा विसर्जन उद्या (ता. ४) आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54811 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..