गोकुळ बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ बातमी
गोकुळ बातमी

गोकुळ बातमी

sakal_logo
By

१९२२०

‘गोकुळ’ची विक्रमी
२० लाख लिटर दूध विक्री
रमजान र्इद, अक्षय्य तृतीयेचा साधला मुहूर्त
कोल्‍हापूर, ता.३ ः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) आज रमजान र्इद व अक्षय्य तृतीयेच्‍या दिवशी एका दिवसात २० लाख २ हजार २१ लिटर दूध विक्री करून नवीन उच्‍चांक गाठला आहे. गोकुळच्‍या इतिहासात आज सर्वाधिक दूध विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी १६ लाख ३८ हजार १८० लिटर्स इतकी दूध विक्री केली होती. दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत गोकुळच्‍या विक्रीत ३ लाख ६३ हजार ८४१ लिटर्सने वाढ झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी आज दिली.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘निर्भेळ आरोग्‍यदायी मलईदार आणि अस्‍सल चवीच्या उत्पादनाने ग्राहकांचा विश्‍वास मिळवला आहे. गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांसह शुद्ध व सकस दुधाला‍ यावर्षीही ग्राहकांनी पसंती दिली आहे. या विक्रीमध्ये दूध उत्पादक, दूध संस्‍था, ग्राहक, कर्मचारी, वितरक, वाहतूक ठेकेदार यांचे योगदान मोलाचे आहे.’’
माजी अध्यक्ष व जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54822 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top