सतेज चषक फुटबॉल स्पर्धेस धडाक्यात सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेस धडाक्यात सुरवात
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेस धडाक्यात सुरवात

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेस धडाक्यात सुरवात

sakal_logo
By

१९१५६
कोल्हापूर : येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पीटीएम विरुद्ध उत्तरेश्वर यांच्यातील लढतीचा एक क्षण. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

लोगो - सतेज चषक फुटबॉल

पहिल्या दिवशी २५ गोलचा धडाका
फुलेवाडी, बालगोपाल, पाटाकडीलचे विजय; मेथे-पाटीलची डबल हॅट्‌ट्रिक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : पांडबा जाधव व रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ पाटाकडील तालीम मंडळ आयोजित डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप पुरस्कृत ‘सतेज चषक’ फुटबॉल स्पर्धेचा पहिलाच दिवस गोल वार ठरला. आजच्या तीन सामन्यांत एकूण २५ गोल झाले. यामध्ये फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने बीजीएम स्पोर्टस्‌वर ५- ४ ने, बालगोपाल तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर ३-२ ने तर पाटाकडील तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळ वर ८-१ ने विजय मिळवला. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्‍घाटन आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, मधुरिमाराजे, प्रल्हाद चव्हाण, डॉ. भारत कोटकर, पीटीएमचे अध्यक्ष एस. वाय. सरनाईक, संभाजी पाटील-मांगोरे, निवास जाधव, शरद जाधव, संपत जाधव, संदीप सरनाईक आदींच्या उपस्थितीत झाले.  
स्पर्धेचा पहिला सामना रोमहर्षक ठरला. फुलेवाडी विरुद्ध बीजीएम यांच्यात झालेला सामना पूर्ण वेळ १ - १ बरोबरीत राहिला. यामध्ये बीजीएमच्या ओंकार जाधवने सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल नोंदवता संघाला आघाडीवर नेले. उत्तरार्धात फुलेवाडीच्या चंदन गवळी याने ६४ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला. अखेर सामना टायब्रेकरवर गेला. यात फुलेवाडीने सामना ५-४ अशा गोल फरकाने जिंकला. फुलेवाडीकडून अक्षय मंडलिक, तेजस जाधव, अरबाज पेंढारी, ऋतुराज संकपाळ, रोहित मंडलिक यांनी गोल नोंदवले, तर बीजीएमच्या निरंजन कामते, वैभव राऊत, सिद्धेश साळोखे, सचिन गायकवाड यांनी गोल नोंदवले. सामन्यातील लढवय्या खेळाडू म्हणून बीजीएमच्या साहिल खोत याला गौरवण्यात आले.  
दुसरा सामना बालगोपाल विरुद्ध ऋणमुक्तेश्वर यांच्यात झाला. सामन्यात ऋणमुक्तेश्वरच्या आकाश मोरे याने १४ मिनिटाला गोल नोंदवला, तर याला प्रतिउत्तर देत बालगोपालच्या अभिनव साळोखे याने १५ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना १-१ बरोबरीत आणला. यानंतर ऋणमुक्तेश्वरच्या प्रकाश संकपाळ याने ३१ व्या मिनिटाला गोल नोंदवत पूर्वार्धात आघाडी घेतली. उत्तरार्धात बालगोपालच्या रोहित कुरणे याने ४५ व ४८ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना ३-२ ने जिंकला. लढवय्या खेळाडू म्हणून ऋणमुक्तेश्वरच्या प्रकाश संकपाळ याला गौरवण्यात आले. 
दिवसाचा तिसरा सामना पीटीएम विरुद्ध उत्तरेश्वर यांच्यात झाला. सामन्यात दोन्ही संघाकडून तब्बल नऊ गोल झाले. यात पीटीएमच्या ऋषिकेश मेथे-पाटील याने डबल हॅट्‌ट्रिक करत ६ गोल नोंदवले. सामन्याचा पूर्वार्ध अटीतटीचा झाला. यात पीटीएमच्या ओंकार पाटील याने सातव्या मिनिटाला गोल नोंदवत आघाडी घेतली. उत्तरार्धात मात्र पीटीएमने वरचष्मा राखत आणखी सात गोल नोंदवले. यात ऋषिकेश मेथे याने ४४, ४७, ५८, ६५, ७६ व ८१ व्या मिनिटांना गोल नोंदवले. प्रथमेश हेरेकर याने ५४ व्या मिनिटाला गोल नोंदवला. उत्तरेश्वरच्या अजित साळोखे याने ७७ व्या मिनिटाला नोंदवलेला एकमेव गोल फुंकर घालणारा ठरला. लढवय्या खेळाडू म्हणून ऊत्तरेश्वरच्या अक्षय वरेकर याला गौरवण्यात आले.

आजचे सामने
 दुपारी २ जुना बुधवार विरुद्ध सम्राटनगर
 दुपारी ४ प्रॅक्टिस विरुद्ध खंडोबा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54824 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top