
हातकणंगले बाल अत्याचार खून प्रकरणी
बलकवडे, यादव यांचे
चाकणकरांकडून कौतुक
कोल्हापूर, ता. ३ ः हातकणंगले तालुक्यातील एका गावात घडलेल्या बालिकेवरील अत्याचार करून खून केल्याप्रकरणी खोचीतील आरोपीला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून ठोस पुरावे संकलित केल्याबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे तर सरकार पक्षातर्फे बाजू मांडणाऱ्या विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांचे महिला राज्य आयोग्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विव्टद्वारे अभिनंदन केले.
हातकणंगले तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी घेतली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी याबाबत कडक कारवाई करावी तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी अवघ्या २७ दिवसांत तपास पूर्ण करून चार्जशिट न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल काल लागला. त्याबद्दल चाकणकर यांनी ट्विव्ट करून अधीक्षक बलकवडे व विशेष सरकारी वकील यादव पाटील यांचे अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54840 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..