​खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ​शिवाजी विद्यापीठाचे ३ राष्ट्रीय विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

​खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ​शिवाजी विद्यापीठाचे ३ राष्ट्रीय विक्रम
​खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ​शिवाजी विद्यापीठाचे ३ राष्ट्रीय विक्रम

​खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ​शिवाजी विद्यापीठाचे ३ राष्ट्रीय विक्रम

sakal_logo
By

लोगो - खेलो इंडिया
​शिवाजी विद्यापीठाचे
तीन राष्ट्रीय विक्रम
एकूण १७ पदकांची कमाई
​कोल्हापूर, ता. ३ : बंगळुरू येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये शिवाजी विद्यापीठ संघाने ८ सुवर्ण, २ रौप्य तर ७ कास्य पदकांसह तीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले.
स्पर्धेत यजमान जैन विद्यापीठाने ​२० सुवर्ण, ​७ रौप्य आणि ​५ कास्य पदकांसह अव्वल स्थान पटकावले. पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी​ने सर्वाधिक ​५१ पदके जिंकली; परंतु ​१७ सुवर्णांसह दुसरे स्थान पटकावले. पंजाब विद्यापीठ तिसरे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ​ प्रथम दहामध्ये राहिले. स्पर्धेत ​२०८ ​विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. दुसऱ्या ​खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स​चा समारोप गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. स्पर्धेत ​२०८ विद्यापीठांमधील ​३ हजार ९०० खेळाडूंनी ​सहभाग नोंदवला होता. शिवाजी विद्यापीठच्या ऋजुता खाडे हिने जलतरणमध्ये, विकास खोडके ११० मीटर अडथळा शर्यत तर सिद्धांत पुजारी याने तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. ४०० मीटर अडथळा शर्यतीत रोहन कांबळे याने सुवर्ण पटकावले; मात्र अवघ्या काही क्षणांमुळे त्याचा राष्ट्रीय विक्रम हुकला. संपूर्ण संघाचे व्यवस्थापक म्हणून रामचंद्र पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54841 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top