पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

तिळवणीच्या तरुणास विनयभंगप्रकरणी शिक्षा
इचलकरंजी : अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने एकास शिक्षा सुनावली. सूरज मिलिंद कांबळे असे त्याचे नाव आहे. दोन विविध कलमाखाली त्याला एक महिना कैद आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तिळवणी (ता. हातकणंगले) येथील सूरज कांबळे याने युवतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना ऑक्टोबर २०१७ मध्ये घडली होती. याप्रकरणी हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक आर. के. रानगर यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीत पीडित युवती, तपास अधिकाऱ्यांसह सात साक्षीदारांच्या साक्ष झाल्या. याप्रकरणी सरकारी वकील हेमंत मोहिते-पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी सूरज कांबळे यास १ महिना कैद आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मणेर मळ्यातून मुद्देमाल चोरीस
गांधीनग : विठ्ठलाई कॉलनी मणेरमळा, उंचगाव (ता. करवीर) येथील सिद्धाप्पा नारायण इंगळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीतील सोने-चांदीचे दागिने असे एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इंगळे बेळगावला गेले होते. शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. तिजोरीतील सोन्याची अंगठी, लॉकेट, मुद्द्या, लहान मुलांच्या एक ग्रॅमच्या व मुलांच्या हातातील चांदीचे कडे असे एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. तसेच सुनील आनंदा पाटील यांच्याही घरी चोरीचा प्रयत्न झाल्याचे पाटील यांनी पोलिसांना सांगितले. सिद्धाप्पा नारायण इंगळे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


१९०८२
कालकुंद्री येथे तरुणाची आत्महत्या
चंदगड ः कालकुंद्री (ता. चंदगड) येथील पराग अशोक वर्पे (वय २८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सोमवारी (ता. २) रात्री घरात कोणी नसताना दारुच्या नशेत त्याने स्लॅपच्या लोखंडी हुकास दोरी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी चंदगड पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. परागचे वडील अशोक वर्पे यांनी वर्दी दिली. पोलीस नाईक आर. पी. किल्लेदार तपास करीत आहेत.

गलगले फाट्यावर अनोळखी मृतदेह
मुरगूड : गलगले फाटा (ता. कागल ) येथील डाव्या बाजूस असलेल्या बसथांब्यामध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. मृताचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळला. याबाबतची वर्दी गलगलेचे पोलिस पाटील दत्तात्रय तुकाराम बांबरे यांनी मुरगूड पोलिसांत दिली आहे.

मारहाणीत तरुण जखमी
कोल्‍हापूर : धैर्यप्रसाद चौक परिसरात झालेल्‍या मारहाणीत निरंजन सावंत (वय २६) हा तरुण जखमी झाला. काल रात्री हा प्रकार घडला. त्यांना सीपीआरमध्‍ये दाखल करण्‍यात आले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

संभाजीनगरात तरुणास मारहाण
कोल्‍हापूर : संभाजीनगर एसटी स्टँन्ड परिसरात झालेल्‍या मारहाणीत तरूण जखमी झाला. विपुल पाटील असे त्या जखमीचे नाव आहे. काल रात्री हा प्रकार घडला. त्याला सीपीआरमध्‍ये दाखल करण्‍यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

अपघातात दोघे जखमी
कोल्‍हापूर : निपाणी महामार्गावर झालेल्‍या अपघातात दोघे जखमी झाले. सुरेश कोंडीबा लोखंडे (वय ३८) व कुमार बाळू हवालदार (४८) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना सीपीआरमध्‍ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

दोन मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर ः शहरासह करवीर तालुयात अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकल चोरीचे प्रकार घडले. टाऊन हॉल येथील पार्किंगमधून काल (ता.२) भरदिवसा चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली. दरम्यान केर्ली फाटा येथून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54844 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top