महाविकास आघाडीच्यावतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीच्यावतीने
महाविकास आघाडीच्यावतीने

महाविकास आघाडीच्यावतीने

sakal_logo
By

१९२३७

कदमवाडीतील बी-टेन्यूअर संपविणार
पालकमंत्री सतेज पाटील; आमदार जयश्री जाधव यांचा कदमवाडीत विजयी मेळावा
कोल्हापूर, ता. ३ : उत्तरच्या पोटनिवडणुकीत विरोधी भाजप उमेदवाराच्या धमक्‍यांना न घाबरता कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडीने आमदार जयश्री जाधव यांना मताधिक्‍य दिले. शाहू कृतज्ञता पर्व संपल्यानंतर कदमवाडीतील बी-टेन्यूर संपविण्याचे आणि कपूर वसाहतीतील जमिनी रहिवासांच्या नावावर करण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांच्या बालेकिल्ल्यातच म्हणजे कदमवाडीत विजयी मेळाव्यात ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘पोटनिवडणुकीत भाजपने हीन दर्जाच्या पातळीवर प्रचार केला. लोकांनी त्याला भीक घातली नाही. कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी व इतर परिसरातील लोकांनी भरभरून दिलेल्या मताधिक्‍यामुळे येथील कामे तात्काळ झाली पाहिजेत. बी टेन्यूअरचे काम पूर्ण करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांना शिबिर घेण्याच्या सूचना दिल्या जातील. कदमवाडीत आता कदम-कदम बढाते चलो म्हणत काम केले पाहिजे.’’
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘सत्तेपासून लांब ठेवून भाजपला त्यांचा खरा चेहरा दाखवून दिला. विकास कामांऐवजी धर्माचा वापर केला. याला शहरवासियांनी सडेतोड उत्तर दिले. महागाईने लोक होरपळताहेत यावर एकही शब्द बोलत नाहीत. पण धर्माच्या आडून राजकारण केले जात आहे.’’
माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, ‘‘छत्रपती शाहू महाराज यांचा विचार पूसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. श्रीराम, हनुमान आमच्या हदयात आहे; पण त्याचा राजकारणासाठी वापर करत नाही. विरोधकांकडून त्यांचा वापर झाला. विरोधकांनी विखारी जातीयवाद पेरण्याचे काम केले. त्याला मतदारांनी धारा दिला नाही.’’
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, ‘‘सत्तेसाठी अनेकांनी जातीयवाद आणला. त्याला न जुमानता उच्चांक्की मतांनी विजयी करून शहराच्या पहिल्या आमदार म्हणून नावलौकिक दिला आहे. त्याला निश्‍चिपणे न्याय दिला जाईल.’’
माजी महापौर भिमराव पवार, खंडेराव घाटगे, राजेश लाटकर, भारती पवार, वैशाली डकरे, सुलोचना नायकवडे, रेखाताई आवडे, उज्ज्वला चौगले, दीपक शेळके, अनिल कारंडे, उदय फाळके उपस्थित होते.

पंधरा दिवसात एक फेरी...
आमदार जयश्री जाधव यांनी कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडीतील लोकांना रेड कार्पेट टाकले पाहिजे. त्यांनी सर्व दबावतंत्र झुगारून मदत केली आहे. एकवेळ कसबा बावड्यात नाही आला तरी चालेल पण कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडीत पंधरा दिवसातून एक फेरी मारलीच पाहिजे, अशी विनंतीही श्री. पाटील यांनी केली.

मी पाटील, महाडिक नाही...
पोटनिवडणुकीत काही लोकांनी कपूर वसाहतीमधील जमीन आम्ही आमच्या नावावर करून घेणार असल्याचा खोटा प्रचार केला; पण कपूर वसाहतीतील लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. कोणाची जमीन हिसकावून घ्यायला मी महाडिक नाही... मी पाटील आहे. त्यामुळे कपूर वसाहत तुमच्या नावावर कशी करायची यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

गावात तोंड दाखवायला जागा नाही
बावड्याची मतमोजणी झाल्यानंतर विरोधक आमचे मताधिक्‍य वाढणार म्हणून सांगत होते. ज्या भूमीतून विरोधी उमेदवार उभा आहे, ती भूमीही त्यांच्यासोबत नव्हती. मग कोणत्या तोंडाने शहरात मते मागत होता. गावात तोंड दाखवायला स्वत:चे गाव सोबत असावे लागते. २००४ ला बावडा, लाईन बाजारमधील १९ हजारपैकी १७ हजार ते १८ हजार मते मला मिळाली. लोकांनी मला गावचा म्हणून स्वीकारले. आमचं नातं गावाशी आहे, कोणाला ब्लकमेल करत नव्हतो म्हणून लोकांनी मते दिल्याचे पाटील यांनी सांगितले.


राजेश लाटकर यांचे कौतुक
जाधववाडी, कदमवाडीतून जाधव यांना मताधिक्‍य मिळवण्यासाठी राजेश लाटकर यांनी पुढाकार घेतला. या भागाच्या विकासासाठी लाटकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना आपणही पाठिंबा दिला पाहिजे, असे म्हणत सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी लाटकर यांचे कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54850 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top